महापालिका परीक्षेत मोबाईलद्वारे कॉपी करणाऱ्या उमेदवाराला रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 16:16 IST2022-10-13T16:15:51+5:302022-10-13T16:16:01+5:30
पुणे महापालिकेत विविध जागांच्या भरतीसाठी सध्या लेखी परीक्षा सुरु

महापालिका परीक्षेत मोबाईलद्वारे कॉपी करणाऱ्या उमेदवाराला रंगेहाथ पकडले
पुणे : पुणे महापालिकेत विविध जागांच्या भरतीसाठी सध्या लेखी परीक्षा सुरु आहेत. बुधवारी ज्युनिअर क्लार्क टायपिस्टच्या परीक्षेत मोबाईलचा वापर करुन कॉपी करणाऱ्या एका उमेदवाराला रंगेहाथ पकडण्यात आले. पवन उत्तम मारक (वय २५, रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्या उमेदवाराचे नाव आहे. त्याचा साथीदार अनिल भारती (रा़ जालना) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तुषार नामदेव बोरावके (वय ३१, रा. नर्हे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एनडीए मधील इंडियन इंन्स्टुमेंट फॉर एरोनॉटीकल इंजिनिअरींग अँड आयटी शास्त्री कॅम्पसमध्ये बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या ज्युनिअर क्लार्क, टायपिस्टपदाची बुधवारी लेखी परीक्षा होती. यातील एनडीएमधील केंद्रावर पवन मारक हा परीक्षेमध्ये मोबाईल व हेडफोनचा वापर करुन त्याद्वारे बाहेर असलेला मित्र अनिल भारती यांला संगणकावरील फोटो पाठवत होता. अनिल भारती हा त्याची उत्तरे पवन याला पाठवून कॉपी करत असताना त्याला पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.