शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम रद्द करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दिले ' एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपये ' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 15:01 IST

पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त खैरे यांनी सहकारनगर येथील एक कार्यालय आरक्षित केले होते.

पुणे : धनकवडी परिसरातील तळजाई पठार येथे राहणारे नंदकुमार विश्वनाथ खैरे यांच्या पत्नी जयश्री यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त खैरे यांनी सहकारनगर येथील एक कार्यालय आरक्षित केले होते. या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचे विधी आणि त्यानंतर एक हजार जणांना भोजन दिले जाणार होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली.त्यांच्या पत्नीच्या पुण्यस्मरणानिमित्त होणारे विधी टाळून आर्थिक मदत करण्याचा निर्णय खैरे यांनी घेतला. या निर्णयाद्वारे समाजाला एक आदर्श निर्माण करून देण्याचा काम खैरे कुटुंबीयाने केले.  खैरे कुटुंबाचा फुले मंडईमध्ये खरेदी विक्रीचा जुना व्यवसाय होता. विश्वनाथ खैरे दलाल असोशियनचे अध्यक्ष असताना त्यांच्या मार्गदर्शनाने गुलटेकडी मार्केटयार्ड सुरू झाले व तेथे दलालीचा व्यवसाय सुरू आहे. गुलटेकडी मंडई येथील शारदा विनायकाची पहिली स्थापना पुजा नंदकुमार खैरे यांच्या हातून झाली. गुलटेकडी मार्केट सुरू होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच पुणे सातारा रस्ता येथे हॉटेल विश्वकमल लॉज नावाने व्यवसाय सुरू केले. ते शिक्षण प्रसारक मंडळीचे सभासद आहेत. लग्नसंबंध जुळवणे, अडचणींमध्ये लोकांना मार्गदर्शन करणे अशा अनेक समाजकार्यात योगदान असते.त्यांनी वर्षश्राद्धाचा कार्यक्रमाचे सर्व नियोजन रद्द झाल्याने पत्नीच्या स्मरणार्थ देणगी देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांना संपर्क करून कळवले. त्यांच्या सांगण्यानुसार तहसीलदार शंकर ठुबे हे स्वत: घरी येऊन धनादेश घेऊन गेले व त्यामुळे  लॉकडाऊनमध्येही खैरे कुटुंबियांना मदत करता आली. लोकांनी उत्फुर्तपणे पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे किमान नियोजन करून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आपापल्या परीने मुख्यमंत्रीनिधीला मदत करावी.निलेश हा नंदकुमार खैरे यांचा मुलगा असून तो विश्वकमल लॉजचे व्यवस्थापन पाहण्याबरोबर अनेक सामाजिक कार्यक्रम करत असतो.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसChief Ministerमुख्यमंत्रीfundsनिधी