काॅमेडी करता येते; तर मग तुमच्यासाठी पुण्यात अाहेत अनेक संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 03:58 PM2018-04-02T15:58:15+5:302018-04-02T17:29:55+5:30

साधारण 1950-60 च्या दशकात अमेरीकेत स्टॅण्डअप काॅमेडी शाेजला सुरुवात झाली हाेती. हे कल्चर अाता हळूहळू भारतात त्यातही पुण्यातही रुजत असून अनेक स्टॅण्डअप काॅमेडी शाेजचे पुण्यात अायाेजन करण्यात येत अाहे.

Can be done; So there are many opportunities in Pune for you | काॅमेडी करता येते; तर मग तुमच्यासाठी पुण्यात अाहेत अनेक संधी

काॅमेडी करता येते; तर मग तुमच्यासाठी पुण्यात अाहेत अनेक संधी

Next
ठळक मुद्देस्टॅण्डअप काॅमेडीला वाढताेय तरुणांचा प्रतिसादपुण्यात अायाेजित करण्यात येत अाहेत शाेज

पुणे : तुम्ही एखाद्या कॅफे मध्ये गेला अाहात अाणि तेथे तुम्हाला तुमची कला सादर करण्याची संधी मिळाली तर ? किंवा तुम्ही ज्या कॅफेमध्ये गेला अाहात तेथे काेणीतरी स्टॅण्डअप काॅमेडी करत असेल तर....तुम्ही म्हणाल असं फक्त बाहेरील देशांमध्येच हाेत असतं. मात्र अाता अाेपन माईक, स्टॅण्डअप काॅमेडीसारखे शाेज भारतात अाणि तेही पुण्यात देखील हाेत असून तरुणांचा भरभरुन प्रतिसाद याला मिळत अाहे. या शाेजच्या माध्यमातून तरुणाईसाठी मनाेरंजनाचं एक नवं माध्यम समाेर अालं अाहे. 
    साधारण 2016 पासून पुण्यात गटागटाने स्टॅण्डअप काॅमेडीचे शाेज करण्यास सुरुवात झाली. त्याचबराेबर अनेक ठिकाणी अाेपन माईक चे कार्यक्रम अायाेजित करण्यात येऊ लागले. अाेपन माईकमध्ये तुम्हाला जी कुठली कला येते ती सादर करण्याची मुभा असते. या शाेजमुळे तरुणांना अापल्या हक्काचं एक व्यासपीठ मिळालं अाहे. अाधी इंग्रजीमध्ये हे शाेज केले जात हाेते. त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. अाता मात्र हळूहळू तरुणांचा अाेढा या शाेजकडे वाढ असून महिन्यातून दाेन तीन शाेज पुण्यामध्ये अायाेजित केले जात अाहेत. या शाेजची सुरुवात भारतात मुंबईतून झाली. मुंबईत काॅस्माेपाॅलिटीयन कल्चर असल्यामुळे तेथे या शाेजला माेठ्याप्रमाणावर रिस्पाॅन्स मिळत अाहे. पुण्यात हे कल्चर रुजायला थाेडासा वेळ लागताेय. मुंबईत खास स्टॅण्डअप काॅमेडीसाठी अनेक क्लब असून तेथे रेग्युलर अनेक शाेज हाेत असतात. पुण्यात विविध कॅफे, बार, स्टुडिअाेजमध्ये हे शाेज केले जात अाहेत. 
    पुण्यातील माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे देशातील विविध भागांमधून अालेल्या नागरिकांची संख्याही माेठी अाहे. शहरातील काेरेगावपार्क, विमाननगर, कल्याणीनगर, बाणेर, हिंजवडी या भागात या नागरिकांची संख्या अधिक अाहे. पुण्यात सुरुवातील इंग्रजी भाषेत या स्टॅण्डअप काॅमेडी शाेजची सुरुवात झाली. अाधी फारसा रिस्पाॅन्स मिळाला नाही. त्यानंतर इंग्रजी काॅमेडीमध्ये हिंदीचा वापर करण्यास सुरुवात केल्यानंतर प्रेक्षकांची संख्या वाढली. याच्या पुढे जात पुण्यातील सारंग साठे या तरुणाने व त्याच्या सहकाऱ्यांनी थेट मराठीतच स्टॅण्डअप काॅमेडीचे शाेज सुरु केले. या शाेजला अाता तरुणांचा माेठा प्रतिसाद मिळत असून अापल्या भाषेतील विनाेद एेकायला मिळत असल्याने त्यांना जास्त भावत अाहेत. 
    गेल्या काही वर्षांपासून पुण्यात स्टॅण्डअप काॅमेडीचे शाेज करत असलेला अाेंकार रेगे म्हणाला, सुरुवतीच्या काळात अाम्ही सहा जणांनी स्टॅण्डअप काॅमेडी करण्यास सुरुवात केली हाेती. अाज 150 तरुण अामच्यासाेबत सहभागी झाले अाहेत. त्यातील 80-90 जण हे नियमित स्टॅण्डअप काॅमेडीचे शाेज करत आहेत. पुण्यात या शाेजसाठी मुंबईसारख्या विशिष्ट जागा नसल्याने विविध कॅफेज, बार अाणि इतर ठिकाणी हे शाेज अायाेजित केले जात अाहेत. तरुणांचा या शाेजला माेठा प्रतिसाद मिळत अाहे. यानिमित्ताने पुण्यात एक नवीन कल्चर रुजू हाेऊ पाहत अाहेत. 
    या स्टॅण्डअप काॅमेडी शाेजची सुरुवात 1950-60 च्या दशकात अमेरिकेत झाली. त्यावेळी तेथेही लाेकांनी त्याला माेठा प्रतिसाद दिला. मात्र कालांतराने तेथील राजकारण, व इतर धार्मिक विषयांवरही उपराेधिक विनाेद केले जाऊ लागल्याने अनेक काॅमेडीयनांची मुस्काटदाबी करण्यात अाली. या शाेजला कुठलिही सेन्साॅरशिप नसल्यामुळे सध्या खुलेपणाने सादरिकरण केले जात अाहे. मात्र येत्या काळात या शाेजवरही बंधने येण्याची शक्यता काॅमेडीयन वर्तवत अाहेत. 

 

Web Title: Can be done; So there are many opportunities in Pune for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.