Pimpri Chinchwad | ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आले आणि दागिने चोरुन गेले
By रोशन मोरे | Updated: April 19, 2023 17:25 IST2023-04-19T17:23:31+5:302023-04-19T17:25:01+5:30
दोन अनोळखी महिलांनी टॉप्स बघण्याचा बहाना केला...

Pimpri Chinchwad | ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आले आणि दागिने चोरुन गेले
पिंपरी : ज्वेलर्सच्या दुकानात दोन महिला ग्राहक म्हणून आल्या कानातील टॉप्स बघण्याच्या बहााण्याने टॉप्सची ६६ हजार रुपये किंमतीची एक जोडी चोरी केली. ही घटना शनिवारी (दि.१५) मे.भांबुर्डेकर सराफ ॲण्ड ज्वेलर्स, भोसरी येथे घडली. या प्रकरणी ज्वेलर्सकडे काम करणाऱ्या तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.१८) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भांबुर्डेकर सराफ ॲण्ड ज्वेलर्स दुकानातील फॅन्सी टॉप्स काऊंटरवर काम करत होत्या. तेथे आलेल्या दोन अनोळखी महिलांनी टॉप्स बघण्याचा बहाना केला. त्यातील डोक्यास व तोंडास सफेद रंगाचा स्कार्प बांधलेल्या महिलेन फिर्यादीने यांनी दाखवलेल्या सहा टॅप्सच्या जोडी पैकी ६६ हजार रुपयांची सोन्याची एक जोडी हाताच्या अंगठ्याखाली लपवून चोरी करत फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.