शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कुकडीच्या सुधारित अहवालास मंत्रीमंडळाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 2:09 AM

भूसंपादनाची कामे मार्गी लागणार; धरण गळती, कालवा अस्तरीकरण, चाऱ्या पोटचाºयांचे नियोजन

घोडेगाव : पुणे जिल्ह्याबरोबरच अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प अहवालास मुंबई येथे मंगळवारी (दि.१८) झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ३ हजार ९४८.१७ कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे डिंभे, माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगा या धरणांची व त्यांच्या कालव्यांची गेली कित्येक वर्षे बंद पडलेली कामे, रखडलेले भूसंपादन, पुनर्वसनाचे विषय मार्गी लागणार आहेत.कुकडी पाटबंधारे प्रकल्प हा डिंभे, माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगा या पाच धरणांचा संयुक्त प्रकल्प आहे. या पाच धरणांमध्ये ८६४.४८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो. या प्रकल्पाद्वारे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर व सोलापुरजिल्ह्यातील करमाळा अशा सात तालुक्यंतील १,४४,९१२ हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो. ७१८.५० किलोमीटर कालव्याद्वारे सिंचनाला पाणी दिले जाते. सिंचनाला पाणी मिळाल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकºयांना मोठा आर्थिक फायदा होत आहे.या प्रकल्पातील धरण व कालव्यांची कामे पूर्ण झाली. मात्र कालवे अस्तरीकरण अभावी शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नव्हते. तसेच चाºया पोटचाºया, भूसंपादन, पुनर्वसन या कामांसाठी निधीची आवश्यकता होता. तसेच वेळोवेळी प्रकल्पात झालेले बदल त्यामुळे किमतीत वाढ झाली. सन २००४ पासून या प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प अहवालास मान्यता मिळावी म्हणून सर्व जण प्रयत्न करत होते.आज दि.१८ रोजी मुंबई येथे मंत्रीमंडळाच्या झालेल्या कॅबिनेट बैठकीत कुकडी प्रकल्पाचा ३९४८.१७ कोटी इतक्या किमतीचा तृतीय सुधारित प्रशासकिय मान्यता प्रस्ताव सादर करण्यात आला. मंत्रीमंडळाने बांधकामाची सद्यस्थिती, किंमतवाढीची कारणे, प्रकल्पाची उर्वरीत कामे याचा विचार करून सात तालुक्यांच्या सिंचनास फायदा होणार असल्याने सुधारित प्रकल्प अहवालास प्रशासकिय मान्यता दिली.यातून धरण सुरक्षा संघटनेने जी कामे प्रस्तावित केली आहेत ती कामे होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे कालवाअस्तरीकरणाची कामे होणार असून शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचू शकणार आहे. तसेच गेली कित्येक वर्षे कालवा गळतीमुळे हैराण असलेली गावे व नुकसान होत असलेली शेती यांना फायदा होणार असून कालव्यांची गळती थांबवणार आहे. या निर्णयामुळे डिंभे, माणिकडोह, वडज या धरणांच्या गळतीची कामे पूर्ण होणार तसेच कालवा अस्तरीकरण, चाºया पोटचाºयाची कामे पूर्ण होणार, जमिनी गेलेल्या शेतकºयांना भूसंपादनाचे पैसे मिळणार आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणी