शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

‘या’ गावच्या ग्रामस्थांचा आगामी सार्वजनिक निवडणुकांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:26 IST

मुळशी तालुक्यातील लवळे फाटा ते सुस या रस्त्याची अवस्था खुपच बिकट झालेली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी लवळे गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा वारंवार वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करून सुध्दा हा रस्ता दुरुस्त झालाच नाही आणि म्हणून...

ठळक मुद्देपुढे येणाऱ्या प्रत्येक सार्वजनिक निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा ग्रामसभेत निर्णय रस्त्याला जवळपास सतरा ते अठरा वर्ष पूर्ण झाले असून या रस्त्याची अवस्था खूपच बिकट

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील लवळेगाव येथील असलेल्या लवळे फाटा ते सुस या रस्त्याची अवस्था खुपच बिकट झालेली आहे. तेव्हा या रस्ताची दुरुस्ती करण्यासाठी लवळे गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा वारंवार अनेक वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करून सुध्दा हा रस्ता पाहिजे तसा दुरुस्त केला जात नसल्याने आता शेवटचा पर्याय म्हणून नाइलाजास्तव इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक सार्वजनिक निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय नुकताच लवळे येथे पार पडलेल्या ग्रामसभेत लवळेकरांकडून घेण्यात आला.लवळेगाव या ठिकाणी सरपंच स्वाती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी उपसरपंच अशोक भोसले,सदस्य वैभव कुदळे,चांगदेव सातव,सविता गावडे,कुलदीप गोटे,राणी आल्हाट,राजू केदारी,भाऊ केदारी,गणेश शितोळे, दत्तात्रय मोरे,मच्छिंद्र काशिलकर,खंडेराया सातव व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी या सभेचे कामकाज हे ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर यांनी पाहिले. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग हे वारंवार खोटे आश्वासन देत असल्याने आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आलेली असल्याचे मत माजी उपसरपंच भाऊ केदारी यांनी काढले.या सभेमध्ये लवळे ते सुस या रस्त्याच्या झालेली दयनीय अवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. तेव्हा लवळे गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करून सुद्धा हा रस्ता पाहिजे तसा दुरुस्त केला जात नाही. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे व याचे काम लवकरात लवकर सुरू केले जाईल. हे मात्र वारंवार सांगण्यात येत असते. परंतु, प्रत्यक्षात मात्र या ठिकाणची परिस्थिती जैसे थे वैसी अशीच आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. तेव्हा ह्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे लवळे गावातील त्याच प्रमाणे आजूबाजूच्या गावातील नागरिकांना खूपच मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्यातच या रस्त्याच्या समस्येमुळे या भागात येणारी पीएमपीएलची बस ही लवकरच बंद करण्यात येइल असे पत्र ही पीएमपीएलच्या अधिकाºयांच्या वतीने लवळे ग्रामपंचायतला देण्यात आलेले आहे. तेव्हा ही बस बंद झाली तर या गावातील व या भागातील शाळकरी मुलांना कॉलेजच्या विध्यार्थ्यांना व येथील नागरिकांना याचा खूपच मोठा नाहक त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे लवळे फाटा ते सुस हा रस्ता नव्याने तयार करण्यात यावा व तो तयार करताना सर्व प्रथम त्याची सुरुवात लवळे फाटा येथुन करावी अशी मागणी या ग्रामसभेत करण्यात आली............लवळे गावामध्ये  असलेल्या रस्त्याला जवळपास सतरा ते अठरा वर्ष पूर्ण झाले असून या रस्त्याची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. याकडे कोणाचेच लक्ष नाही या बाबतीत अनेक वेळा आंदोलने केली. तसेच बऱ्याच वेळा आमदार खासदार व इतर नेत्यांना भेटून आमची व्यथा ही मांडून झाले पण याची दखल कोणीच घेतली नाही. तेव्हा आता येणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीवर बहिष्कार घातल्या नंतर तरी कोणत्या तरी राजकीय व्यक्तीला आमची समस्या समजेल व आम्हाला या त्रासातून मुक्त करतील अशी आशा आम्हाला वाटत आहे.स्वाती गायकवाड, लवळे सरपंच 

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षाElectionनिवडणूक