Pune Crime | बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेतीन लाखाचे दागिने लांबवले, चांडोलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 02:21 PM2023-04-22T14:21:58+5:302023-04-22T14:22:08+5:30

अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांचे सोन्या -चांदीचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे...

By breaking the lock of the closed flat, the thieves stole jewelery worth three and a half lakhs Incident at Chandoli | Pune Crime | बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेतीन लाखाचे दागिने लांबवले, चांडोलीतील घटना

Pune Crime | बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेतीन लाखाचे दागिने लांबवले, चांडोलीतील घटना

googlenewsNext

राजगुरुनगर (पुणे) : बंद फ्लॅटचा दरवाजाच्या कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांचे सोन्या -चांदीचे दागिने लांबवल्याची घटना ( दि. २१ ) चांडोली (ता. खेड ) येथे घडली आहे. याबाबत निलेश चंद्रकांत बांगर ( रा. त्रिमूर्ती अपार्टमेंट चांडोली (ता. खेड ) यांनी खेड पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोली येथील त्रिमूर्ती अपार्टमेंटमधील फिर्यादीचे बंद फ्लॅटच्या दरवाज्याचा कोयंडा अज्ञात चोरट्याने उचकटून घरामध्ये प्रवेश केला. बेडरुममध्ये ठेवलेले कपाट उचकटून ड्रॉवरमधील रोख रक्कम तेरा हजार रुपये, तीन लाख रुपये किमतीचे सहा तोळे वजनाची चैन, पंचवीस हजार रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाची अंगठी, पाच हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम सोन्याचे पान, पाच हजार रुपये किमतीची चांदीचे पैंजण असा एकूण तीन लाख ४८ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरटयांनी लांबविला.

Web Title: By breaking the lock of the closed flat, the thieves stole jewelery worth three and a half lakhs Incident at Chandoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.