शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Butterfly Month: पुण्यात दिसलं जगातलं सर्वांत छोटं 'फुलपाखरू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 19:36 IST

सप्टेंबर महिना फुलपाखरू महिना साजरा केला जात असल्याने या महिन्यात येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या नोंदीत सुमारे ४४ फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत.

ठळक मुद्देसर्वेक्षणामध्ये कॉमन ग्रास यलो, एमिग्रेंट, पामफ्लाय, वंडरेर, ब्लू मोरमॉन यांची नोंद

श्रीकिशन काळे 

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाचा आवार जैवविविधतेचे संपन्न असा आहे. त्यामुळे येथे फुलपाखरांच्या अनेक प्रजाती दिसून येतात. सप्टेंबर महिना फुलपाखरू महिना साजरा केला जात असल्याने या महिन्यात येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या नोंदीत सुमारे ४४ फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यासाठी महिनाभर दररोज अर्धा तास फुलपाखरांची नोंद करण्यात येत होती. यामध्ये जगातील सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्वेल पहायला मिळाले.

दर वर्षीचा सप्टेंबर महिना हा बटरफ्लाय मंथ म्हणून  भारतात साजरा केला जातो. भारतातील फुलपाखरू निरीक्षकांनी फुलपाखरांच्या नोंदी साठी एकत्र येऊन सप्टेंबर महिना हा फुलपाखरू महिना म्हणून साजरा करायचा असे ठरले आहे. फुलपाखरांवरती काम करणाऱ्या ३० विविध संस्था एकत्र येऊन हा महिना एखाद्या सणाप्रमाने साजरा करतात. महिनाभर फुलपाखरांची छायाचित्रे काढून Inaturalist, ifoundbutterflies आणि Indian biodiversity portal अश्या संकेतस्थळांवर प्रत्येकजण आपल्या नोंदी टाकतात. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ‘लेट‌्स काऊंट बटरफ्लाय’ या संपूर्ण महिनाभर चाललेल्या या उपक्रमात पर्यावरण शास्त्राचा विद्यार्थी आणि फुलपाखरू प्रेमी रजत जोशी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून एकूण ४४ प्रजातींची नोंद एका महिन्यात केली आहे. या संपूर्ण उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंग परदेशी यांनी आणि पर्यावरण शास्त्र विभागप्रमुख डॉ. रूपाली गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.  

कसे होते गणनेचे स्वरूप 

- दररोज अर्धा तास महाविद्यालयाच्या परिसरातील एका भागात जाऊन फुलपाखरांची नोंद करायची.- या पद्धतीत महाविद्याल्यातील परिसरात एका विशिष्ट वाटेवर जाऊन नोंद. यात एकेरीच पाहणी केली.

दुर्मीळ प्लेन पफिनची नोंद

महाराष्ट्र राज्य फुलपाखरू सर्वेक्षणामध्ये कॉमन ग्रास यलो, एमिग्रेंट, पामफ्लाय, वंडरेर, ब्लू मोरमॉन यांची नोंद आहे. पुणे शहरात दुर्मिळ असे plain puffin फुलपाखरू पण ह्या सर्वेक्षणात आढळून आले.

महाविद्यालयात मुबलक आवडते खाद्य

फर्ग्युसनमध्ये टणटणी म्हणजे लॅन्टेना ही वनस्पती असून, ही फुलपाखरांची सर्वात आवडती आहे. ती मुबलक असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रजाती दिसून आल्या.  शिवाय महावदियालयाच्या परिसरात palm, casia tora ( टाकळा), एरंड, कन्हेर, पानफुटी अश्या काही खाद्य वनस्पती सुद्धा आहेत.

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणFargusson Collegeफर्ग्युसन कॉलेजSocialसामाजिक