शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

"...परंतु त्या दिवशी राहु-केतु काय डोक्यात आलं अन् १० लाख डिपॉझिट लिहिलं"; डॉ. केळकरांनी सांगितली 'प्रोसिजर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:13 IST

आम्ही कधीही फॉर्मवर डिपॉझिट असं लिहीत नाही. मी माझ्या एवढ्या वर्षांच्या काळात कधीच असं केलं नव्हतं

पुणे: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात १० लाख मागितल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर डॉ घैसास यांच्यावर टीकाही झाली होती. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. डिपॉझिटच्या या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाने डिपॉझिट हि पॉलिसी मागील आठवड्यात रद्द केली. त्यावरून आज पुन्हा दीनानाथचे वैद्यकीय संचालक डॉ धनंजय केळकर यांनी मत व्यक्त केलं आहे. आम्ही कधीही फॉर्मवर डिपॉझिट असं लिहीत नाही. मी माझ्या एवढ्या वर्षांच्या काळात कधीच असं केलं नव्हतं.  पण त्यादिवशी राहू केतू डोक्यात काय आलं आणि या लोकांनी डिपॉझिट लिहून दिलं काय माहित नाही. अशी प्रतिक्रिया केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

केळकर म्हणाले,  डिपॉझिट सगळ्यांकडून घेत नाही. गरीब लोकांकडून तर अजिबातच घेत नव्हतो. ज्यांना जमेल त्यांना पैसे मागितले जात होते. पण या प्रकरणानंतर आम्ही डिपॉझिट हि पॉलिसी रद्द केली आहे. इथून पुढे ती घेतली जाणार नाही. त्यादिवशी असं काय झालं यांनी कागदावर डिपॉझिट लिहून दिल हे माहित नाही.

सुश्रुत घैसास हे कन्सल्टन्ट म्हणून १०  वर्षे काम करत आहेत. त्यांनी दडपणाखाली वागत असून, धमक्यांचे फोन पाहता मी राजीनामा देत आहे. मला व्यवस्थित काम करता येणार नाही. म्हणून राजीनामा देत आहे असे त्यांनी पत्रकात लिहून देऊन आमच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे . गुरुवारी ते पदमुक्त होणार आहेत. स्टाफच्या बोलण्याची पद्धत व्यवस्थित नाही. ती आम्ही ट्रेनिंग सुरु केली आहे. शासकीय अहवाल ३ येणार आहेत. ते सर्व अहवाल आल्यावर त्यावर अभ्यास करून मत व्यक्त करण्यात येईल. आम्ही कोर्टात पैसे भरतो. मनपाचा टॅक्स थकला नाही. नाहीतर त्यांनी बंदच केलं असत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आम्ही कोर्टात टॅक्स भरतोयअसेही त्यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHealthआरोग्यWomenमहिलाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliceपोलिस