शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मी त्या ताईवर उपकार केले नाहीत, फक्त माझं कर्तव्य बजावलं; धाडसी तरुणाच्या विनम्रतेनं मनं जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 16:36 IST

सगळीकडून कौतुक होतंय खरं पण हे माझं कर्तव्य होतं , उलट तुम्ही माझं कौतुक करून उपकाराची भावना दाखवताय

पुणे:  प्रेमसंबंध असताना मारहाण केल्याने तिने त्याच्याशी ब्रेकअप केला. त्याच रागातून तरुणाने भरदिवसा सदाशिव पेठेत तिच्यावर कोयत्याने वार करून संपविण्याचा प्रयत्न केला. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे या हल्लेखाेर माथेफिरुचे नाव आहे. परिसरात असणाऱ्या लेशपाल जवळगे आणि त्याचा मित्र हे दोघे हिम्मत दाखवत पुढे आले आणि माथेफिरू तरुणाला पकडले. त्यांनी आणि लोकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने दाखवलेली ही हिम्मत आणि माणुसकीने तरुणीचे प्राण वाचले; मात्र भरदिवसा, भर रस्त्यात अशा प्रकारे वार करण्याची हिम्मत हाेतेच कशी? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे. लेशपालने या थरारक घटनेत शंतनूच्या हातातील कोयता एका हाताने धरून त्याच्या बॅग फेकण्याचे धाडस केले. आणि मग त्याला पकडले. या धाडसाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे. अशातच लेशपाल जवळगे याने एक फेसबुक पोस्ट केली आहे.  

मी फक्त माझं कर्तव्य बजावलं

''सगळीकडून कौतुक होतंय खरं पण हे माझं कर्तव्य होतं , उलट तुम्ही माझं कौतुक करून उपकाराची भावना दाखवताय... मी त्या ताईवर उपकार नाहीत केले मी माझं कर्तव्य पार पाडलं ... तरीही   सर्वांचे खुप खूप आभार  आहेत. तर या घटनेनंतर खूप फोन येत आहेत. सगळे सत्काराला बोलवत आहेत. पण ती घटना घडली, तेव्हा त्या मुलाला पोलीस स्टेशनला दिल्यानंतर मी रूमवर गेलो आणि एक-दीड तास रडत होतो. थोडा उशीर झाला असता तर तिचा मृत्यू कसा झाला, हे मला लोकांना सांगावं लागलं असतं. मी फक्त माझं कर्तव्य बजावलं. हात जोडतो, पण मला आता सत्काराला बोलावू नका"  

लेशपाल हा आडेगाव माढा येथील रहिवासी आहे. मेकॅनिकल इंजिनिअर झाला आहे. मागील ४ वर्षांपासून तो पुण्यात आला आहे. स्पर्धा परिक्षा देण्यासाठी म्हणूनच तो पुण्यात आला. पर्वती पायथ्याला राहतो. अभ्यासिकेत बसण्यासाठी नवी पेठेत येतो. गावी शेती आहे. त्यादिवशी सदाशिवपेठेतून तो चालला होता. त्याच्यासमोरच मुलगी पळते आहे व तिच्यामागे कोयता घेऊन एक मुलगा धावतो आहे असा प्रसंग घडला. त्याने लगेचच पुढे धाव घेत त्या मुलाच्या हातातील कोयत्यासह त्याला धरले. त्यानंतर काही मुले धावत आली व त्यांनीही त्या मुलाला जेरबंद केले. दिल्लीत एका मुलीची हत्या होत असताना बघे काहीही न करता फक्त पहात बसल्याचे दृश्य बघितल्यापासून अशा मुलांविषयी चीड होती व ती या घटनेतून बाहेर आली असे लेशपालने सांगितले.

भरदिवसा, भर रस्त्यावर?

-  तरुणी मंगळवारी सकाळी परीक्षा असल्याने बसने ग्राहक पेठ येथे उतरली. त्यावेळी शंतनू समोर होता. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने तुझ्याशी बोलायचे नाही, आईशी बोल, असे सांगून ती चालत जाऊ लागली. तिने एका मित्राला बोलावून घेतले. ती चालत चालत पेरुगेट पोलिस चौकीजवळील स्वाद हॉटेलजवळ आली. तोपर्यंत तेथे तिचा मित्र दुचाकीवरून आला. ती त्याच्या दुचाकीवरून जाऊ लागताच शंतनूने तिचा हात धरून ‘माझे ऐक नाही तर तुला आज मारुनच टाकतो, आज एकतरी मर्डर करतोच’, अशी धमकी दिली.- तरुणाने दिलेली धमकी ऐकून तिच्या मित्राने दुचाकी थांबविली. तो गाडीवरुन उतरला. तोपर्यंत शंतनू याने त्याच्याकडील बॅगेतून कोयता काढून त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकवून तो पळाला. त्यानंतर शंतनूने आपला मोर्चा तरुणीकडे वळविला. हे पाहून ती पळून जाऊ लागली. तो तिच्या मागे कोयता घेऊन धावू लागला. तिच्या डोक्यात तो वार करणार, तितक्यात तिचा पायात पाय अडकून ती खाली पडली. त्यामुळे तिच्या डोक्याला निसटता वार लागला.- त्यानंतरही शंतनूने तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तिने हात मध्ये घातल्याने हाताच्या मनगटाला लागला. शंतनूला ढकलून ती पळू लागली. तेव्हा लेशपाल आणि लोक जमली. तेव्हा त्याने त्यांच्यावर कोयता उगारला. तरीही त्यातील काही जणांनी त्याला पकडले. लोकांनी त्याला बेदम चोप दिला. तिला पोलिस चौकीत नेले. तेथून रुग्णालयात दाखल केले. 

तरुणांची मदत 

अनेकदा रस्त्यावर कोणी हल्ला केला तर लोक बघ्याची भूमिका घेतात. काही जण व्हिडीओ करतात. एमपीएससी करणारे तरुण या परिसरात असतात. ते बघ्याची भूमिका न घेता तरुणीच्या मदतीला धावले म्हणून ती माथेफिरुच्या तावडीतून वाचू शकली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीcollegeमहाविद्यालय