शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

बाप्पांमुळे उद्याेग- व्यवसायांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 8:24 PM

देशभरातील गणेशोत्सवाच्या अर्थकारणाचा अभ्यास केला असता 20 हजार कोटींचा व्यवसाय असलेला उत्सव म्हणून समाेर येत अाहे. इतकेच नव्हे तर दरवर्षी या आकडेवारीत 20 ते 30 टक्यांनी वाढ होते.

पुणे :  लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेतील विविध उद्योगव्यवसायांना चालना मिळणार आहे. बदलत्या काळानुसार उत्सवाने देखील गेल्या काही वर्षांपासून कात टाकलेली पाहवयास मिळते. गणेशोत्सव हा केवळ एका धर्मापुरता उत्सव नसून या उत्सवाच्या औचित्याने इतर सर्वधर्मातील अर्थकारणाला तितकाच वेग येतो.         तीन वर्षापूर्वी दिल्लीतील एका संस्थेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील गणेशोत्सवाच्या अर्थकारणाचा अभ्यास केला असता त्यांनी 20 हजार कोटींचा व्यवसाय असलेला उत्सव म्हणून उल्लेख केला होता. इतकेच नव्हे तर दरवर्षी या आकडेवारीत 20 ते 30 टक्यांनी वाढ होते. असे संशोधन करणा-या संस्थेचे म्हणणे आहे. त्यानुसार आकडेमोड करायची झाल्यास यंदाचा गणेशोत्सव किमान 40 हजार कोटींचा आहे. अर्थव्यवस्थेला चालना देवून त्यात प्रचंड बदल घडवून आणण्यात गणेशोत्सवाचा वाटा मोठा आहे. मंडप, सजावट, मिरवणूक , विद्युत रोषणाई, देखावे, धार्मिक विधी आणि अहवाल वाटप यांचा खर्च अनिवार्य असून अद्याप या बाबींवरील खर्च कमी करण्यास कुठलेही मंडळ सहजासहजी तयार होत नसल्याचे दृश्य पाहवयास मिळते. मंडळाचे स्वरुप व त्यांचा खर्च याविषयीची आकडेवारी सांगायची झाल्यास मध्यम स्वरुपाच्या मंडळाचा सजावटीवरील खर्च साधारण पाच ते दहा लाखांपर्यत आहे. तर मोठ्या मंडळाचा सजावटीचा खर्च पंधरा ते वीस लाखांपर्यत जातो. मध्यम स्वरुपातील एका गणेश मंडळाचा संपूर्ण उत्सवाचे बजेट किमान दहा ते पंधरा लाखांपर्यत असून मोठ्या गणेश मंडळांचा खर्च हा दुप्पट / तिप्पट असल्याचे पाहवयास मिळते. 

       गणेशोत्सवाची गंगोत्री म्हणून पुण्याचा उल्लेख करावा लागेल. नोंदणीकृत मंडळांची संख्या 4700 असून तेवढीच मंडळे अनोंदणीकृत आहेत. या आकडेवारीच्या चौपटीने शहरातील हौसिंग सोसायटीमध्ये उत्सव साजरा होतो. याशिवाय प्रत्येक शाळेत देखील उत्सव आनंदाने साजरा केला जातो.45 लाख वस्तीच्या पुणे शहरात किमान 4 लाख घरांमध्ये गणरायाचे आगमन होते. याचा किमान खर्च दोन ते तीन हजार रुपयांच्या आसपास असून याप्रमाणे विचार केल्यास शहरातील गणेशोत्सवातील अर्थकारणाची व्याप्ती कळुन येईल. असे सराफ सांगतात. 

सामाजिक समरसता व समाजपयोगी अर्थकारण जपणारा उत्सव 

 सामाजिक समरसता व समाजपयोगी अर्थकारण जपणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाचा उल्लेख करावा लागेल. उत्सवाकरिता लागणारी विड्याची पाने शुक्रवार पेठेतील तांबोळी समाज विकतो. श्रीं च्या मुर्तीपुढे जी पाच फळे ठेवावी लागतात त्यासाठी बागवान बांधवांकडे जावे लागते. तर सजावटीचे सामान घेण्यासाठी रविवार पेठेतील बोहरी आळीत जावे लागते. एकूणच हा उत्सव सामाजिक समरसता जपून समाजपयोगी अर्थकारण करणारा उत्सव आहे. - आनंद सराफ (गणेशउत्सवाचे अभ्यासक) 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवbusinessव्यवसाय