शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘ती ’बस आंदोलकांमुळे नव्हे तर शॉर्टसर्किटने पेटली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 15:55 IST

कोथरूड आगारासमोर रस्त्यावर उभी असलेली एक बस पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पेटली. भारत बंदच्या पार्श्वभुमीवर काही आंदोलकांनी बसला आग लावल्याची अफवा शहरभर पसरली.

ठळक मुद्देपेटलेल्या बसचा व्हिडिओ, छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरलही बस शॉर्टसर्किटमुळे पेटल्याचे काही वेळाने स्पष्ट

पुणे : बसला अचानक आग लागण्याच्या घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. रस्त्यावर उभ्या असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने अचानक पेट घेतल्याची घटना कोथरूड आगारासमोर घडली. पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने बसमध्ये प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, ही बस आंदोलकांनी पेटवल्याची अफवा काहीकाळ पसरली होती.‘पीएमपी ’च्या बसेस देखभाल दुरूस्ती अभावी सातत्याने पेट घेत आहेत. पीएमपी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीच्या बसेस जागेअभावी रात्री रस्त्यावर उभ्या केल्या जातात. कोथरूड आगारासमोर रस्त्यावर उभी असलेली एक बस पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पेटली. या सुमारास पीएमपीची बससेवा सुरू होते. त्यामुळे ही काही वेळात मार्गावर येणार होती. पण त्यापुर्वीच बस पेटल्याने मोठी दुर्घटना टळली. आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीएमपी कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमनच्या जवानांनी काही वेळातच आग विझविली. पण तोपर्यंत अर्धी बस जळून खाक झाली. ही बस खासगी ठेकेदाराची होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसची पाहणी करून आग कशामुळे लागली हे पाहिले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, भारत बंदच्या पार्श्वभुमीवर काही आंदोलकांनी बसला आग लावल्याची अफवा शहरभर पसरली. पेटलेल्या बसचा व्हिडिओ, छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे पीएमपी प्रशासनही सतर्क झाले होते. मात्र, ही बस शॉर्टसर्किटमुळे पेटल्याचे काही वेळाने स्पष्ट झाले. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलfireआगBharat Bandhभारत बंदMNSमनसे