शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बस का सोडत नाही म्हणून चालकास बेदम मारहाण : शिवाजीनगर बसस्थानकावरील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 15:53 IST

जर बस सोडायची नसेल तर आगारातून बाहेर का आणली वाक्यावरून सुरु झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकावर घडली आहे.

पुणे : जर बस सोडायची नसेल तर आगारातून बाहेर का आणली वाक्यावरून सुरु झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकावर घडली आहे. या घटनेत बस चालकाला काही प्रवाशांनी बेदम मारहाण केली असून जखमी चालकास ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजय जगन्नाथ जाधव असे जखमी चालकाचे नाव आहे. 

  याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर आगारातून एम एच १४ बीटी ४८६०ही बस फलाटावर आणण्यात आली. ही बस लागल्यावर काही युवकांनी या बसमध्ये जागा पकडली व चालकाला बस नाशिकला जाणार का असे विचारले. त्यावर चालकाने बस नाशिकला जाणारी आहे पण निघण्याचा आदेश मिळाला नसल्याने जाणार की नाही माहिती नसल्याचे उत्तर दिले. त्यावरून त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. आणि त्यानंतर चालकाला मारहाणही झाली. दरम्यान वाहक (कंडक्टर) आधीच खाली उतरला होता. त्याने गाडीत चढून ड्रायव्हरला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चिडलेल्या काही तरुणांनी बाहेरून पाण्याच्या बाटल्या व दगड आत फेकले. त्यातील काहींनी ड्रायव्हर केबिनमधूनही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. अखेर परिवहन महामंडळाचे इतर सहकारी आल्यावर त्यांनी ड्रायव्हर व कंडक्टर यांनी बसमधून बाहेर काढले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. 

टॅग्स :PuneपुणेBus DriverबसचालकCrimeगुन्हाPoliceपोलिस