पुण्यात शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे जोडे मारत दहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 12:41 IST2022-06-26T12:41:29+5:302022-06-26T12:41:59+5:30

बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वाघोली येथे वाहतूक सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले

Burning of Eknath Shinde statue in Pune on of Shiv Sena | पुण्यात शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे जोडे मारत दहन

पुण्यात शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे जोडे मारत दहन

वाघोली : पुण्यातील वाघोली मध्ये शिवसैनिक आक्रमक, बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याला जोडे मारत दहन केले.                                      

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वेठीस धरले आहे. या शिवसेनेच्या आमदारांना एकत्रित करून शिवसेनेचे खच्चीकरण केले आहे. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वाघोली येथे वाहतूक सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.  जिल्हा प्रमुख युवराज दळवी तसेच वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र तांबे व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संजय सातव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वाघोली येथील कट्टर शिवसैनिकाने एकनाथ शिंदे सह बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे जोडे मारत शिंदेचा पुतळा दहन करण्यात आला. 

यावेळी वाघोलीतील शिवसैनिक संजय सातव, राजेंद्र पायगुडे, विशाल सातव, युवराज दळवी, राजेंद्र तांबे, किशोर पाटोळे, अंकुश कोतवाल, प्रवीण कांबळे, रवी काळे, इतर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

Read in English

Web Title: Burning of Eknath Shinde statue in Pune on of Shiv Sena