Pune | राजगुरूनगर शहरात भरदिवसा घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:32 PM2022-12-22T12:32:18+5:302022-12-22T12:35:01+5:30

भरदिवसा चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिक भयभयीत...

Burglary in broad daylight in Rajgurunagar city; Lumpas instead of six and a half lakhs | Pune | राजगुरूनगर शहरात भरदिवसा घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

Pune | राजगुरूनगर शहरात भरदिवसा घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

Next

राजगुरूनगर (पुणे) : राजगुरुनगर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून राक्षेवाडी, साठेनगर परिसरात वेगवेगळ्या घटनेत सुमारे साडेसहा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. भरदिवसा चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकही भयभयीत झाले आहे.

राजगुरुनगर शहर व परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनामध्ये वाढ होत आहे. राक्षेवाडी येथील बालाजी पार्क मधील राहुल शिवाजी रासकर यांच्या बंद घराचे सकाळी साडेसात वाजता कुलुप तोडले. त्यानंतर घरातील लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने व एक लाख दहा हजाराची रोकड असा एकूण पाच लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. दुसरी चोरीची घटना पाऊने पाच वाजता पुणे नाशिक महामार्गालगत लक्ष्मी रेडींग कंपनी नावाचे बिल्डींग मटेरीयल सप्लायचे दुकानात घडली. संजय गणपत सांडभोर दुकानाच्या पाठीमागे ठेवलेले मटेरीयल गिऱ्हाईकाला देण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने दुकानात जाऊन टेबलच्या ड्रॉवर मधील एक लाख वीस हजाराची रोख रक्कम लांबविली. चोरटा सीसीटिव्हीमध्ये कैद झाला असून खेड पोलिस तपास करित आहे.

Web Title: Burglary in broad daylight in Rajgurunagar city; Lumpas instead of six and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.