समृद्धी महामार्गावर बसला अपघातात, प्रवाशांविषयी 'येथे' मिळेल माहिती

By रोशन मोरे | Updated: July 1, 2023 15:08 IST2023-07-01T15:07:24+5:302023-07-01T15:08:18+5:30

या बसमध्ये नागपूर जिल्ह्यातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली....

buldhana Bus accident on Samriddhi highway, information about passengers can be found 'here' | समृद्धी महामार्गावर बसला अपघातात, प्रवाशांविषयी 'येथे' मिळेल माहिती

समृद्धी महामार्गावर बसला अपघातात, प्रवाशांविषयी 'येथे' मिळेल माहिती

पुणे : Buldhana Bus Accident- समृद्धी महामार्गावर नागपूरवरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सला सिंदखेडराजा जवळील पिंपळकुटा येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बसने पेट घेतल्याने २५ जणांचा जळून मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान  या बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष ०७१२ २५६२६६८ किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांच्याशी ८८६००१८८१७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्स(एम २९ बीई १८१९) या खाजगी बसचा मौज पिंपळखुटा, तहसील सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे रात्री दोन वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या बसमध्ये नागपूर जिल्ह्यातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली.

बसचा चालकाने टायर फुटल्याने अपघात झाल्याची माहिती दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तर, सर्व पक्षीय नेत्यांनी अपघातामध्ये निधन पावलेल्या प्रवाशांना समाज माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title: buldhana Bus accident on Samriddhi highway, information about passengers can be found 'here'