पुणे - केशवनगरमध्ये दोन मजली इमारती कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 14:53 IST2018-07-21T14:20:30+5:302018-07-21T14:53:42+5:30
७ जणांना काढले बाहेर, आणखी दोन जण अडकल्याची भीती

पुणे - केशवनगरमध्ये दोन मजली इमारती कोसळली
पुणे : पुण्यातील बी. टी. कवडे रोडवरील केशवनगर येथे दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ७ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून आणखी दोन जण व दोन गायी यात अडकल्या आहेत.
शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ढिगाऱ्याखाली ९ जण अडकले असल्याची माहिती मिळाली होती. त्यातील ७ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून ते किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच आणखी दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय दोन गायीही यामध्ये अडकल्या असल्याचं सांगितलं जात आहे. सुभाष भांडवलकर यांची ही इमारत असून त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. अग्निशामक दलाचे जवान आणि नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.