ई-वेस्टपासून ६00 ड्रोन बनविण्याचा 'प्रताप'; २२ व्या वर्षी १२८ देशांतून आले निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 04:14 AM2020-02-05T04:14:24+5:302020-02-05T04:16:18+5:30

वयाच्या चौदाव्या वर्षी लागली गोडी

build 600 drones from E-West; Invitations came from 128 countries in 22 year old | ई-वेस्टपासून ६00 ड्रोन बनविण्याचा 'प्रताप'; २२ व्या वर्षी १२८ देशांतून आले निमंत्रण

ई-वेस्टपासून ६00 ड्रोन बनविण्याचा 'प्रताप'; २२ व्या वर्षी १२८ देशांतून आले निमंत्रण

Next

- श्रीकिशन काळे 

पुणे : वयाच्या चौदाव्या वर्षी त्याला ड्रोनचे वेड लागले आणि तो आज केवळ २२ व्या वर्षीच आधुनिक तंत्रज्ञानाचा ड्रोन बनविणारा जागतिक वैज्ञानिक बनला आहे. तो ई-वेस्ट पासून ड्रोन तयार करतो आणि आतापर्यंत ६०० ड्रोन तयार केले आहेत. आता तो अनेक संस्थांसोबत काम करत असून, ड्रोन बनविण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडलही मिळाले आहे. प्रताप एन. एम. असे त्याचे नाव असून, तो एका कार्यक्रमासाठी पुण्यात आला होता. तेव्हा त्याने आपल्या यशाचा पट उलगडून सांगितला.

कर्नाटकमधील निताकली या एका लहानशा गावातून शिक्षण घेत ड्रोनमध्ये ‘एकलव्य’ बनून आज तो जगासाठी ‘ड्रोन गुरू’ बनला आहे. प्रतापने स्वत:मधील कला जाणून या ड्रोनच्या क्षेत्रात उंच भरारी मारली आहे. सुरवातील ८८ वेळा तो यात अपयशी झाला. पण तरी त्याने जिद्द सोडली नाही. ड्रोनला पैसे जमा करण्यासाठी तो एका ठिकाणी स्वच्छता करायचा. त्याचे त्याला २० रुपये मिळायचे. ते पैसे जमा करून अनेक वैज्ञानिक आणि संशोधकांना ईमेल पाठवून ड्रोनबाबत माहिती विचारायचा. ई-वेस्ट पासून ड्रोन तयार करून आंतरराष्ट्रीय ड्रोन स्पधेर्साठी त्याने आपले ३६० किलोचे ड्रोन तयार केले. जपानला स्पर्धेला जाण्यासाठी आईने मंगळसूत्र मोडून त्याला पैसे दिले. तेथे त्याला सुवर्णपदक मिळाले.

सहीसाठी ८ दिवस उपाशी...

जपानला जाण्यासाठी प्रतापला चेन्नई येथील एका प्राध्यापकाची सही हवी होती. त्याला चेन्नईला जायला पैसेही नव्हते. तो चेन्नईला गेला. पण त्याला पाहून प्राध्यापकने सही दिली नाही. पण तो तेथेच थांबला. पैसे नसल्याने आठवडाभर उपाशी राहिला होता. ३६ दिवसांनंतर त्याला संबंधित प्राध्यापकाने सही दिली.

ड्रोन वाचवतो माणसांचे प्राण

आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारे ड्रोन तयार केले आहेत. नुकताच कर्नाटकमध्ये पूर आला होता. तेव्हा कर्नाटक सरकारने माझ्या ड्रोनचा वापर केला. पूरग्रस्त लोकांना अन्न, औषध पोहोचविण्याचे काम या ड्रोनने केले. ड्रोनच्या मदतीने हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत.
- प्रताप एन. एम., सीईओ, एरोव्हेल स्पेस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी

Web Title: build 600 drones from E-West; Invitations came from 128 countries in 22 year old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.