कॅम्प परिसरात म्हशीची दुचाकीला धडक, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 10:46 IST2021-08-26T10:34:35+5:302021-08-26T10:46:07+5:30

Pune : संपूर्ण घटना दुकानाबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

Buffalo hit by bike in camp area, video goes viral on social media | कॅम्प परिसरात म्हशीची दुचाकीला धडक, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

कॅम्प परिसरात म्हशीची दुचाकीला धडक, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात रस्त्यावरुन जाणाऱ्या म्हशीनं दोन दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. याप्रकाराने परिसरातील लोकांना चांगलंच घाबरवून सोडलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पुण्यात कॅम्प परिसरातील रस्त्यावरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद झालीये. 

रस्त्यावरून काही म्हशी जात होत्या. त्यांचे मालकही सोबत होते. गाड्यांची आणि पादचाऱ्यांची ये-जा सुरू होती. प्रत्येक म्हशीला दोर बांधण्यात आला होता. पण त्यातली एक म्हैस अचानक उधळली.. त्यानंतर तिनं मालकाच्या हातून निसटत थेट समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या म्हशीने रस्त्यावरील दोन दुचाकींना धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. 

या प्रकरणी संबंधित म्हशीच्या मालकाविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तीन जणांना अटक केलीये. ही संपूर्ण घटना दुकानाबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

Read in English

Web Title: Buffalo hit by bike in camp area, video goes viral on social media