प्रेयसीचा लॉजवर नेऊन गळा चिरून निर्घृण खून; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 14:47 IST2022-07-11T14:42:19+5:302022-07-11T14:47:28+5:30
स्वारगेट-सातारा रस्त्यावरील शितल लॉजवरील प्रकार...

प्रेयसीचा लॉजवर नेऊन गळा चिरून निर्घृण खून; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : प्रियकरासोबत लॉजवर गेलेल्या प्रेयसीचा तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यातील स्वारगेट-सातारा रस्त्यावरील शितल लॉजवर ही घटना घडली आहे. सकाळी रूमची साफ-सफाई करण्यास आलेल्या कामगाराने रूमची पाहणी केली असता त्याला बाथरूममध्ये तरुणीचा रक्ताचा थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला.
दिप्ती काटमोडे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी व तिचा प्रियकर दोघे रात्री लॉजवर आले होते.
दरम्यान, आज सकाळी नेहमीप्रमाणे रूमची साफ-सफाई करण्यासाठी लॉजचा कामगार रूममध्ये गेला. त्यावेळी त्याला बाथरूममध्ये तरूणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्याने ही माहिती पोलीसांना दिली.
माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिचा गळा चिरून खून केल्याचे समोर आले आहे. माहिती घेतल्यानंतर दिप्ती तिच्या मित्रासोबत लॉजवर रात्री आली असल्याचे समजले. पोलीसांकडून पसार झालेल्या त्या मित्राचा शोध घेतला जात आहे.