शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! बहिणीच्या लग्नासाठी कपडे खरेदीसाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 10:23 IST

भावाचा जागीच मृत्यू तर मित्र गंभीर जखमी...

नसरापूर (पुणे) : बहिणीच्या लग्नासाठी पुण्यामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी निघालेल्या तरुणाचा पुणे-सातारा महामार्गावर केळवडे फाट्यावर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला आहे. अजय रामचंद्र पिलावरे (वय २४, रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा, सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याचा मित्र गौरव हिरामण जाधव हा जखमी झाला आहे.

अजय पिलावरे याच्या बहिणीचे येत्या सहा जूनला लग्न असून, त्यानिमित्ताने स्वतःच्या व घरातील मंडळीचे कपडे खरेदी करण्यासाठी त्याचा मित्र गौरव समवेत ते पुण्याला दुचाकीने (क्र. एमएच ११ - सीएल ५२६५) जात होते. यावेळी गॅस टाकीने भरलेला ट्रक (क्र. एमएच ११ - सीएच ६९४२) महामार्गावरून जात असताना इंडिकेटर न लावता किंवा कोणतीही सूचक सूचना न देता ट्रक अचानक सेवा रस्त्याकडे वळविला. त्यावेळी पाठीमागून येणारी दुचाकी ट्रकच्या मधोमध जोरदार धडकली. यात अजयचा मृत्यू झाला, तर गौरव जखमी झाला. यावेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जखमींना नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत असताना यात अजय पिलावरे याचा मृत्यू झाला.

याबाबत अप्पासो मळेकर यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार राजगड पोलिसांनी ट्रक चालक सुरेंद्र शंकर जाधव (रा. तळदेव, महाबळेश्वर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीsatara-acसातारा