शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

माहितीपुस्तिकांचा भुर्दंड

By admin | Updated: June 4, 2015 05:28 IST

बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि त्याचे पालक प्रथम वर्ष वर्गाच्या प्रवेशासाठी धडपड आहेत. शहर तसेच, पुण्यातील वरिष्ठ महाविद्यालयातून इच्छुक

पिंपरी : बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि त्याचे पालक प्रथम वर्ष वर्गाच्या प्रवेशासाठी धडपड आहेत. शहर तसेच, पुण्यातील वरिष्ठ महाविद्यालयातून इच्छुक शाखेचा अर्ज घेत आहेत. अर्जासाठी माहितीपुस्तक माथी मारले जात असून, त्याची किंमत दोनशे ते १ हजार रुपये अशी आहे. प्रवेश घ्या अगर घेऊ नका मात्र, माहितीपुस्तकाची सक्ती असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे. मात्र, काही महाविद्यालयातर्फे मोफत माहितीपुस्तकाचे वाटप होते. मार्च महिन्यात झालेल्या बारावीचा निकाल २७ मे रोजी आॅनलाईन जाहीर झाला. तेव्हापासूनच पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील वरिष्ठ महाविद्यालयानी प्रवेश अर्ज विक्रीस सुरुवात केली आहे. प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे आणि दाखले जमा करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू आहे. इच्छुक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी फिरत आहेत. अर्ज आणि माहितीपुस्तिका शुल्क आकारणी केली जात आहे. एका माहितीपुस्तकांची किंमत दोनशे ते १ हजार रुपयांपर्यत आहे. पुस्तकात अर्ज जोडलेला असतो. तोच महत्वाचा असतो.यामध्ये प्रथम वर्गाचे सक्तीचे विषय तसेच, वैकल्पिक विषय, माध्यम, विविध प्रकाराचे शुल्क,वसतीगृह आदीची माहिती असते. केवळ दोन ते तीन पाने विद्यार्थ्यांला उपयुक्त असतात. इतर २० ते ३० पानांमध्ये त्या शैक्षणिक संस्थेची तसेच, गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती असते. यामुळे हे आकर्षित आकारातील माहितीपुस्तक केवळ शोभेचे ठरते. मात्र, त्याचा भुर्दड विद्यार्थी व पालकांना पडतो. महाविद्यालयात प्रवेश घेणे निश्चित नसले तरी, माहितीपुस्तक खरेदी करावे लागते. पर्याय म्हणून प्रत्येक विद्यार्थी साधारणता ३ ते ४ महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाचा अर्ज भरावा लागतो. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी रकम भरुन अर्ज विकत घ्यावा लागतो. काही महाविद्यालयात आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया असूनही माहितीपुस्तक घ्यावेच लागते. यामुळे साधारणता हजार ते दोन हजार रुपये या माहितीपुस्तकावर खर्ची होतात. प्रवेश निश्चित होताच, महाविद्यालयात वेगवेगळे भरमसाठ शुल्क भरुन प्रवेश घ्यावा लागतो.(प्रतिनिधी)