शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

मळद येथे कॅनॉलवरील पूल खचला , ग्रामस्थांची गैरसोय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:54 AM

मळद (ता. दौंड)येथे गावाला जोडणाºया खडकवासला कॅनालवरील पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, मळद गावाला जोडणारा हा पुल मुख्य मार्ग असल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.

कुरकुंभ : मळद (ता. दौंड)येथे गावाला जोडणाºया खडकवासला कॅनालवरील पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, मळद गावाला जोडणारा हा पुल मुख्य मार्ग असल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. वाहतूक बंद असतांनाही येथूनही दुचाकीस्वार या मार्गाने जात आहे. तर मोटार चालक मळद येथील रेल्वेच्या जुन्या नँरोगेज मार्गावरून धोकादायक पद्धतीने वापर करत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याआधी मुख्य पुलाची पुर्नबांधणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पुणे-सोलापूर महामार्गा लगत असणाºया मळद गावातून खडकवासला कॅनॉलची बांधणी १९८३ च्या सुमारास करण्यात आली होती. त्याच दरम्यान मळद गावाला रहदारीसाठी या कॅनॉलवरून पुलाची बांधणी करण्यात आली होती. त्यामुळे जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलावरून आजपर्यंत वाहतूक सुरु आहे. या दरम्यान मळद गावाची वाढलेली लोकसंख्या व रहदारीची बदललेली साधने यामुळे दिवसेंदिवस या पुलाची अवस्था खराब झाली आहे. मात्र पुलाच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे.मळद या गावाच्या सभोतालच्या परिसरातून हा कँनाल गेला आहे. यामुळे येथे जाणारा प्रत्येक नागरिक हा या कँनाल वरूनच जातो. या ठिकाणी जवळपास चार जागेवरती पुल बांधण्यात आले आहेत. त्यापैकी मळद गावाठानाला जोडणारा मुख्य पुल, प्राथमिक शाळेला जोडणारा दुसरा पादचारी पुल व रणवरे वस्तीला जोडणारा पुल असे तीन पुल बांधण्यात आले आहेत. हे पुल सिमेंटचे आहेत. चौथा पुल हा भंडलकर वस्ती येथे असून तो लोखंडी आहे. या चारही पुलांची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली आहे. यामुळे या पुलांची बांधणी करणे गरजेचे आहे. मळद ग्रामपंचायतने २०१५ साली खडकवासला शाखा रावणगाव उपभियांता दौंड यांना लेखी पत्राद्वारे दिलेली होती. मात्र, याबाबत कुणीच दखल घेतली गेलेली नाही. प्राथमिक शाळेजवळ असणा-या पुलावरून रोज शालेय मुलांची व परिसरातल्या नागरिकांची वर्दळ असते. पर्यायी मार्ग नसल्याने जीव मुठीत धरूनच त्यांना प्रवास करावा लागतो.भंडलकर वस्ती वरील लोखंडी पुलाची देखील अवस्था अत्यंत बिकट आहे. मात्र काहीच पर्याय नसल्याने नागरिक याचा उपयोग करतात. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार खडकवासला कँनालचे अधिकारीच असतील यात शंका नाही त्यामुळे याची वेळीच गंभीर दखल घेवून नव्याने पुल बांधने आवश्यक आहे.मळदला जोडणारा मुख्य मार्ग बंद झाल्याने वाहतुकीची अतिशय गैरसोय होत आहे त्यातही पयार्यी मार्ग अतिशय अरुंद व कठडे नसल्याने तो अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे नवीन पुलाची बांधणी लवकरात लवकर करून मिळावी तसेच गावातील प्रत्येक पुल दुरुस्ती किंवा नव्याने बांधून दिला जावा यासाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली आहे.- महेश रणवरे, सरपंच मळद.मळद ग्रामपंचायतचे कुठलेही पत्र या आधी मिळाले नाही. पुलाला तडे गेले त्याच दिवशी या पुलाची पाहणी करून तात्काळ नवीन पुलाचे इस्टीमेट तयार करण्यासाठी वरिष्ठांना सांगितले आहे. लवकरच याचे पुनर्निर्माण केले जाईल सध्या या पुलावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे-साळुंके, सहायक अभियंता,खडकवासला दौंडमळद ग्रामपंचायतच्या (२७ आॅगस्ट १५)च्या सभेमध्ये या पुलाच्या नव्या बांधकामासंदर्भात चर्चा झाली होती. त्यानुसार या धोकादायक पुलाच्या कामाकरिता खडकवासलाच्या रावणगाव शाखेत लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कुठल्याच अधिकाºयांनी याची पाहणी केली नाही. विशेष बाब म्हणजे या पत्राला त्यांच्या वरिष्ठांकडे देण्यातच आले नसल्याची बाब खुद्द सहायक अभियंता यांनी सांगितली. त्यामुळे शाखा अधिकारी कुठल्या प्रकारे काम करत आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे .वाहतूक नँरोगेज वरून मळद येथून दौंड बारामती हा रेल्वे मार्ग गेलेला आहे. या पूर्वी येथे नँरोगेज रेल्वे रूळ होता. मात्र, आता तो ब्रॉडगेज करण्यात आला आहे. त्यामुळे या कँनाल वरील नँरोगेज रुळाचा छोटा पुल रिकामा आहे. सध्या अतिशय अरुंद व कठडे नसलेल्या या पुलावरून वाहतूक सुरु आहे. मात्र, ही वाहतूक अतिशय धोकादायक असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणे