Pune | सात-बारा उताऱ्यावरील नावात दुरुस्ती करण्यासाठी घेतली लाच; शिनोलीचे लाचखोर तलाठी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 22:05 IST2023-03-24T22:04:14+5:302023-03-24T22:05:02+5:30
विलास शिगवण असे या तलाठ्याचे नाव आहे...

Pune | सात-बारा उताऱ्यावरील नावात दुरुस्ती करण्यासाठी घेतली लाच; शिनोलीचे लाचखोर तलाठी गजाआड
घोडेगाव (पुणे) : शिनोली (ता. आंबेगाव) येथील तलाठी विलास शिगवण यास एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. विलास शिगवण असे या तलाठ्याचे नाव आहे.
पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्याने सात-बारा उताऱ्यावरील नावात दुरुस्ती करावी, यासाठी सन २०२१ रोजी अर्ज केला होता. परंतु, नावात बदल होत नव्हता. त्यामुळे वैतागून संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला.
शुक्रवारी सापळा रचून दुपारच्या सुमारास तलाठी कार्यालय शिनोली येथे १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी विलास शिगवण यास पकडले. रात्री उशिरापर्यंत घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.