शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

पुणेकरांना दहा दिवस 'शुद्ध' हवेचा श्वास; लॉकडाऊनमुळे वाहनांना ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 14:43 IST

पहिल्याच दिवशी शहरातील पीएम २.५ ची पातळी ३० वर आली असल्याने ती आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे.

ठळक मुद्देशहरात संपूर्ण लॉकडाऊन केल्याने लाखो वाहने रस्त्यावर; प्रदूषणात मोठी घट

पुणे : नव्याने लॉकडाऊन सुरू केल्याने शहरातील प्रदूषणावर मोठा परिणाम झाला असून, पुणेकरांना आता दहा दिवस शुद्ध हवेचा श्वास घेता येणार आहे. कारण सर्व वाहने, धूर सोडणारी कारखाने बंद आहेत. पहिल्याच दिवशी शहरातील पीएम २.५ ची पातळी ३० वर आली असल्याने ती आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे.शहरात संपूर्ण लॉकडाऊन केल्याने लाखो वाहने रस्त्यावर आली नाहीत. त्यामुळे हवेची पातळी धोकादायकवरून चांगली या स्थितीवर आल्याचे स्पष्ट होत आहे. या काळात ज्यांना प्रदूषणामुळे विविध आजारांचा त्रास होत होता, तो देखील कमी झाला. या विषयी फुफ्फुसविकार तज्ज्ञ आणि चेस्ट रिसर्च फांउडेशनचे प्रमुख डॉ. संदीप साळवी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,वाहने कमी झाल्याने कार्बन डायऑक्साइड बंद झाला. ज्यांना फुफ्फुसाचा, हृदयाचा आजार आहे, अस्थमा, ब्लडप्रेशर आहे, त्यांना या दहा दिवसांमध्ये शुध्द हवा मिळणार आहे. अन्यथा इतर वेळी शुध्द हवा मिळत नाही. लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्याच्या बदल्यात शुध्द हवा आपल्याला घेता येत आहे.

शुध्द हवा म्हणजे काय ?नायट्रोजन : ७८.०९ %ऑक्सिजन : २०.९५%अरगॉन  : ०.९३ %  काबर्न डायऑक्साइड : ०.०४ %पाण्याची वाफ : ०.४

प्रदूषणाचा शरीरावर काय परिणाम ?एरवी शहरात शुध्द हवा मिळत नाही. त्यासोबत कार्बन डायऑक्साइड, धुलीकण, बॅक्टेरिया, विषाणू, विविध परागकण आपण श्वासाद्वारे शरीरात घेत असतो. जे आपल्या शरीराला हानी पोचवतात. यामुळे हृदयावर परिणाम होऊन हायपरटेंशन, हृदयाचे आजार, हृदय बंद पडणे असा धोका असतो. फुफ्फुसांना इन्फेक्शन, विसराळूपणा, अस्थमा, फुफ्फुसाचा कॅन्सर, स्ट्रोक, अल्झायमर असे आजार होऊ शकतात.===============================१ लिटर इंधन जाळण्यासाठी १७०० लिटर ऑक्सिजनचारचाकी वाहन चालविण्यासाठी १ लिटर पेट्रोल लागत असेल, तर त्या इंधनाला जळण्यासाठी १७०० लिटर ऑक्सिजनची गरज असते. याचाच अर्थ आपण किती मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन वापरतो आणि त्यातून आपल्यालाच घातक धूर हवेत सोडतो. ऑक्सिजन नसेल, तर पेट्रोल असूनही वाहन सुरू होणार नाही, अशी माहिती डॉ. संदीप साळवी यांनी दिली.==========================

पुण्यातील हवेची गुणवत्तामार्च २०२०    : १८४जुलै २०२०     : ३५  ==================हवेची गुणवत्ता०-५० : स्वच्छ हवा५०-१००: समाधानकारक१००-३०० : खराब  

टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषणtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस