शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

Breaking: प्रत्येक ठिकाणी वेगळा नव्हे, आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 13:36 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यात राज्यासाठी निर्णय घेतला जाणार आहे.

बारामती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही, असे स्पष्टीकरण  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी बोलताना दिले.

बारामती येथे कोरोना आढावा बैठक शनिवारी (दि. १०) झाली. या बैठकीनंंतर पवार माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले,  राज्य शासनाच्या एकाही हॉस्पिटलमध्ये इजेंक्शन कमी पडत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्याबद्दलही चर्चा झाली आहे.  जिल्ह्यात याबद्दल कशा पद्धतीने उपाययोजना राबवायच्या याबद्दल आज पुण्यात बैठक आहे.

पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. त्यामध्ये चर्चा होईल. तसेच या बैठकीमध्ये सोमवारपासून दुकाने उघडू द्या अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्याबाबत देखील चर्चा होईल. याबाबत आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल. बारामतीत बैठक घेऊन इंजेक्शन, बेड, लसीकरण, रुग्णवाहिका याचा आढावा घेतला.  कोरोनाची होणारी रूग्णवाढ आपल्याला रोखायची आहे. त्यासाठी काही कठोर निर्बंध घालून दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिस यंत्रणेने करावी, अशा सुचना दिल्या आहेत.-------------------------

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद म्हणाले, राज्यासाठी ५० हजार रॅमिडिसेव्हर इंजेक्शन दिल्या जातात. त्यापैकी पुणे जिल्ह्याला ७ हजार मिळतात. तर ४५० बारामतीसाठी मिळतात. या इंजेक्शनच्या काळाबाजारा विषयी अद्याप एकही तक्रार आमच्याकडे नाही. पालकमंत्र्याच्या सूचनेप्रमणे १५ दिवस आधीच रेमिडिसिव्हरचा पुरेसा साठा खरेदी करून ठेवण्यात आला आहे. डिपीडिसी अंतर्गत शासकीय उपजिल्हा रूग्णालयांमध्ये रेमिडेसिव्हरचा कोणताही तुटवडा नाही. येथील रूग्णांना गरजेनुसार ते इंजेक्शन दिले जात आहे.

बारामती शहरातील १७ वार्डपैकी ५ वार्ड आणि तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. बारामतीमध्ये दररोज ७०० ते ८०० लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रूग्णसंख्या दिसून येत आहे. प्रशासन व्यवस्थित सर्व्हे करून आवश्यक लोकांच्या चाचण्या करत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रेट ३० टक्क्यांपर्यंत दिसून येत आहे.कटेंन्मेंट झोन मध्ये कडक निर्बंध पाळणे गजेचे आहे. तरच रूग्णसंख्या कमी होईल असेही प्रसाद यावेळी म्हणाले.

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे