शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Breaking : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी कोरोनाचा प्रवेश; ४ शेती कामगारांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 19:39 IST

गोविंद बागेतील चार शेती कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट

ठळक मुद्देकोरोना रुग्णांची संख्या ४७० वर;२४८ रुग्णांवर यशस्वी उपचार

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक पाठोपाठ बारामती येथील ‘गोविंद बाग’ निवासस्थानी कोरोनाचा प्रवेश झाला आहे. गोविंद बागेतील चार शेती कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली. गोविंद बाग येथील शेती काम करणारे ३ पुरूष आणि एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

शुक्रवारी (दि. २१) शहर आणि तालुक्यातील एकूण ८ जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांची संख्या ४७० वर गेली आहे. त्यापैकी २४८ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तर १९७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. रूई येथील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या बळीची संख्या २५ वर गेली आहे. गणेशोत्सवाला शनिवारी (दि. २२) सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी गणेश प्रतिष्ठापनाकरण्यासाठी मंडप उभारू नये, गणेश मुर्तीची स्थापना, मंदिर किंवा पक्क्या बांधकाम असलेल्या ठिकाणी करावी. गणेश मुर्तीची उंची ४ फुटांपेक्षा अधिकअसू नये. प्रतिष्ठापना तसेच विर्सजनाच्या वेळी मिरवणूक काढू नये,प्रतिष्ठापना करताना ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.———————————

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत टाटा ट्रस्ट उभारणार 'कोविड केअर रुग्णालय'बारामती शहर आणि तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तातडीने कोविड केअर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार टाटा ट्रस्टच्या मदतीने बारामतीत ७५ बेडसाठी ऑक्सिजनची सुविधा, २५ बेडसाठी व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच शहरातील सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात १०० बेडसाठी ऑक्सिजन सुविधा,  १५ व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बारामतीत रूई येथील रुग्णालयासह २३० ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार