शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

पुण्यात ब्रेक फेल झालेल्या ट्रकची ६ वाहनांना धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 15:29 IST

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची कात्रजच्या नव्या बोगद्याकडून येताना उतारावर ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढील किमान ८ वाहनांना धडक दिली.

ठळक मुद्दे८ जण जखमी, सातारा -मुंबई बायपासवर नवले पुलाजवळील दुर्घटना

पुणे : साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची कात्रजच्या नव्या बोगद्याकडून येताना उतारावर ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढील किमान ८ वाहनांना धडक दिली. त्यात ८ जण जखमी झाले आहेत़.जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे़. ही घटना वडगाव येथील पुलावर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली़. याबाबत सिंहगड पोलिसांनी सांगितले की, साताऱ्याहून नारळ घेऊन जाणाऱ्या तामिळनाडुतील ट्रकचे उतारावर नवले पुल व वडगाव पुलादरम्यानच्या विश्वास हॉटेलसमोर ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले़. त्यामुळे त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले़. त्याने पुढे असलेल्या वाहनांना अक्षरश: चिरडले़. त्यामध्ये १ दुचाकी, २ कार, २ रिक्षा आणि एक मिनी ट्रकचा समावेश आहे़. या अपघातात २ पुरुष व एक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत़. या अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस तातडीने घटनास्थळी आले़. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली़. तोपर्यंत नागरिकांनी जखमींना जवळच्या नवले हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत़.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल