शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

सराफांनीही बुडविला एलबीटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2015 03:45 IST

शहरातील सराफ व्यावसायिकांकडून एलबीटीच भरला जात नसून, त्यांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने अनेक महिन्यांपासून परवानगी दिली नसल्याने

पुणे : शहरातील सराफ व्यावसायिकांकडून एलबीटीच भरला जात नसून, त्यांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने अनेक महिन्यांपासून परवानगी दिली नसल्याने कोट्यवधींचा एलबीटी थकला आहे. व्यापाऱ्यांना जकात असताना १०० रुपयांसाठी ३ रुपये जकात भरावी लागत होती. एलबीटी सुरू झाल्यापासून सोन्यावर १०० रुपयाला १० पैसे तर दागिन्यांवर १०० रुपयाला ५० पैसे जकात भरावी लागत आहे. तरीही सराफ व्यावसायिकांकडून जकात भरली जात नसल्याचे उजेडात आले आहे.महापालिकेचे मिळकत कर भरण्याचे राहून गेलेल्या सर्वसामान्य पुणेकरांच्या घरासमोर पालिका प्रशासन बॅन्ड वाजविते, दुसरीकडे सोने-चांदीचा कोट्यवधींचा एलबीटी थकविणाऱ्यांवर कारवाई होत नाही. एलबीटी बुडविणाऱ्या सराफ व्यावसायिकांची तपासणी करण्याची परवानगी महापालिकेकडून राज्य शासनाकडे मागण्यात आली आहे. मात्र, शासनाने त्याला परवानगी दिलेली नाही, अशा व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर जाऊन महापालिकेने बॅन्ड वाजवावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी केली आहे. सराफ व्यावसायिकांवर कारवाई करण्यास परवानगी द्यावी याकरिता आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रधान सचिवांना पाठविलेले पत्र बालगुडे यांनी जाहीर केले आहे. यामध्ये एलबीटी बुडविणाऱ्या ५० सराफांची यादी आयुक्तांनी प्रधान सचिवांना पाठविली आहे.महापालिकेला जकात असताना २०१२-१३ या आर्थिक वर्षामध्ये सराफ व्यावसायिकांकडून २५ कोटी रुपयांची जकात मिळाली होती. परंतु १ एप्रिल २०१३ पासून एलबीटी लागू झाल्यानंतर वर्षाला केवळ ६ कोटी रुपये जकात सराफ व्यावसायिकांनी जमा केली आहे. नोंदणी प्रमाणपत्र न घेताच व्यवसाय करणे, मालाच्या बिलावर स्थानिक संस्थाकर नोंदणी क्रमांक नसणे, असे आढळत आहे. सप्टेंबर २०१४ पासून कोणत्याही व्यावसाायिकांकडे तपासणी न झाल्याने एलबीटीच्या उत्पन्नांवर परिणाम झाला आहे, असे आयुक्तांनी प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.