सोळा वर्षीय युवतीला गर्भपात करण्यास भाग पाडणारा प्रियकर व त्याच्या साथीदारास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 09:29 PM2021-12-01T21:29:02+5:302021-12-01T21:29:11+5:30

गुन्ह्यातील युवतीचा गर्भपात करणारे डॉक्टर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात करण्यात आली

boyfriend and his accomplice arrested for forcing 16 year old girl to have an abortion | सोळा वर्षीय युवतीला गर्भपात करण्यास भाग पाडणारा प्रियकर व त्याच्या साथीदारास अटक

सोळा वर्षीय युवतीला गर्भपात करण्यास भाग पाडणारा प्रियकर व त्याच्या साथीदारास अटक

Next

पुणे : अल्पवयीन सोळा वर्षीय युवती सोबत शारीरिक संबंध ठेवून गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या प्रियकर व त्याच्या साथीदारासह गर्भपात करणार्‍या डॉक्टरला येरवडापोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून अमित अबदेश यादव (वय 18 रा. निरामय हॉस्पिटल जवळ, वडगावशेरी) व त्याचा साथीदार धनंजय नामदेव रोकडे (वय 38 ,रा. वडगावशेरी गावठाण) यांच्यासह गर्भपात करणारे डॉक्टर अनिल बाळकृष्ण वरपे (वय 59, रा. वडगाव शेरी पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. वडगावशेरी येथील एका सोसायटीच्या शेजारील अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये हा गंभीर गुन्हा घडला.

येरवडापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती व तिचा प्रियकर यांचे मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. तिचा प्रियकर अमित याने शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केले होते. त्यामुळे तिला गर्भपात करावा लागला होता. दरम्यान धनंजय रोकडे याने देखील जबरदस्तीने युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्याच प्रियकराने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांमध्ये पाठवला.

याप्रकरणी दोन आरोपींना 27 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांना सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान याच गुन्ह्यातील युवतीचा गर्भपात करणारे डॉक्टर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात करण्यात आली. त्यांना 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे निरीक्षक विजयसिंह चौहान करीत आहेत.

Web Title: boyfriend and his accomplice arrested for forcing 16 year old girl to have an abortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app