दुर्दैवी! इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडून मायलेकराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 18:56 IST2022-06-04T18:54:40+5:302022-06-04T18:56:42+5:30

वडगाव मावळ नायगाव गावच्या हद्दीतील घटना...

boy and his mother dies after drowning in Indrayani river basin pune latest news | दुर्दैवी! इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडून मायलेकराचा मृत्यू

दुर्दैवी! इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडून मायलेकराचा मृत्यू

वडगाव मावळ (पुणे ): वडगाव मावळ नायगाव गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या पात्रात पाण्यात बुडून आई व मुलाचा मृत्यू झाला आहे. पुनम दिनेश शिंदे (वय ३८) आणि युवराज दिनेश शिंदे (वय १४) या मायलेकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हे दोघे कामशेत येथे राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार सकाळी आई व मुलगा इंद्रायणी नदी पात्रात गोधड्या धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी युवराज हा पाण्यात पडला त्याला वाचविण्यासाठी आई पुनम हिने पाण्यात उडी मारली. ते दोघेही पाण्यात बुडाले. त्यानंतर त्यांना पुनमचा भाऊ अक्षय टाकवे व दाजी विजय लालगुडे यांनी त्या दोघांना पाण्याबाहेर काढले.

त्यानंतर उचचारासाठी कामशेत येथील एका खाजगी रूग्णालयात नेले. उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अब्दुल शेख पुढील तपास करीत आहेत.

Web Title: boy and his mother dies after drowning in Indrayani river basin pune latest news