Pune Crime: ‘इथे दारू पिऊ नका' म्हणाल्याने डोक्यात फोडली बिअरची बाटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 14:04 IST2021-12-22T13:56:44+5:302021-12-22T14:04:03+5:30
पुणे : वाटेत दारू पीत बसलेल्यांना एका महिलेने ‘इथे दारू पिऊ नका’, असे सांगितल्याने चौघा दारुड्यांनी महिलेबरोबर असलेल्या तरुणाच्या ...

Pune Crime: ‘इथे दारू पिऊ नका' म्हणाल्याने डोक्यात फोडली बिअरची बाटली
पुणे : वाटेत दारू पीत बसलेल्यांना एका महिलेने ‘इथे दारू पिऊ नका’, असे सांगितल्याने चौघा दारुड्यांनी महिलेबरोबर असलेल्या तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौरभ संजय डोंगरे, अमित देवकर, रोहित देवकर व पवार (सर्व रा. महालेनगर, वडारवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सिद्धार्थ लक्ष्मण कट्टीमणी (वय २९, रा. सीता सदन, गोखलेनगर रोड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांची मावशी हे महालेनगर येथे त्यांच्या भाडेकरूकडे भाडे मागण्यासाठी रविवारी रात्री साडेआठ वाजता गेले होते. तेथे मोकळ्या जागेत फिर्यादीच्या ओळखीचे चौघे जण दारू पीत बसले होते. फिर्यादीच्या मावशीने त्यांना इथे दारू पिऊ नका. भाडेकरू कसे येणार जाणार असे म्हणाल्या. यावरून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मावशीला शिवीगाळ केली. रोहित देवकर याने फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक उकिर्डे अधिक तपास करीत आहेत.