शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याने गमावले दोन्ही हात आणि पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 20:02 IST

घराच्या छतावर खेळताना उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने साडेतीन वर्षां गंभीर जखमी झाला होता..

ठळक मुद्देमहावितरणचे अधिकारी तसेच घरमालकाविरोधात गुन्हा दाखल

पुणे : कात्रज येथील सच्चाईमातानगर भागात भाड्याने राहणाऱ्या आजीच्या घरी आल्यानंतर घराच्या छतावर खेळताना उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने गंभीर जखमी झालेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु असून दुर्घटनेला जबाबदार असल्याप्रकरणी महावितरणचे अधिकारी तसेच घरमालकाविरोधात गुन्हा दाखल केला. आदी गणेश गायकवाड (वय ३.५ वर्षे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याचे वडील गणेश अनंता गायकवाड (वय २९, सध्या रा. आंबेडकर चौक, बोपोडी-औंध रस्ता, मूळ रा कोंढवळे, वेल्हा) यांनी यासंदर्भात भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,घरमालक मनोज सोडमिसे तसेच महावितरणचे अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश टेलरिंग काम करतात. त्यांचे काका कात्रज येथील सच्चाईमातानगर भागात भाड्याने राहतात. १८ एप्रिल रोजी गणेश यांची पत्नी आणि त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा आदी त्यांच्याकडे सच्चाईमाता नगर परिसरात आले होते. तेव्हा तो सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गच्चीवर खेळत होता. त्यावेळी गच्चीवरून जाणाऱ्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीला त्याचा स्पर्श झाला. त्यावेळी तो या घटनेत गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयता दाखल करण्यात आले. त्यात त्याच्या हात आणि पायांच्या स्नायूंना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याला दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले आहेत.गणेश यांचे काका मनोज सोडमिसे याच्या घरी सच्चाईमाता नगर येथे राहतात. सोडमिसे याने सच्चसाईमाता नगर येथे महावितरणच्या मोठ्या आकारच्या रोहित्राजवळ दुमजली घर बांधले आहे. इमारत आणि रोहित्र यांच्यात केवळ एक फुटांचे अंतर आहे. तर तेथूनच महावितरणची उच्च दाबाची वाहिनी पुढे गेली आहे. सोडमिसे यांच्या घरावरून ही वीजवाहिनी गेलेली असून चार ते पाच फुट उंचीवर त्या वाहिनी आहेत. त्या दिवशी आदी खेळत होता.त्यावेळी त्याच्या हातात सळई होती. तिचा या वाहिनीला स्पर्श झाल्याने हा अपघात झाला. दरम्यान याप्रकरणी त्याच्या वडीलांनी दिलेल्या फियार्दीनुसार पोलिसांनी तपास केला. तेव्हा घरमालक आणि महावितरणच्या अधिकाºयांमुळे हा अपघात झाल्याचे समोर आले. त्यानंतर याप्रक?णी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. केसकर करत आहेत.

टॅग्स :katrajकात्रजmahavitaranमहावितरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस