शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

खुन्नस काढण्यासाठी आलिशान गाड्या पेटवून देणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 3:15 PM

घटना धायरी परिसरातील रायकरनगरमधील उज्वल टेरेसमधील पार्किंगमध्ये आलिशान गाड्यांवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या २९ मार्च रोजी पहाटे अडीच वाजता घडली होती़ 

ठळक मुद्देधायरीतील घटना : परस्पर काटा काढण्याचा प्रयत्न 

पुणे : एकाबरोबर असलेली खुन्नस काढण्यासाठी दुसऱ्यांच्या आलिशान गाड्या जाळणाऱ्या दोघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे़. ही घटना धायरी परिसरातील रायकरनगरमधील उज्वल टेरेसमधील पार्किंगमध्ये २९ मार्च रोजी पहाटे अडीच वाजता घडली होती़.श्रीकांत सतीश थोपटे (वय २५, रा़ प्रयाग रेसिडेन्सी, धायरी) आणि अक्षय विष्णु मोरे (वय २२, रा़ चव्हाणनगर, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. याप्रकरणी हसन शेख (वय ३४, रा़ धायरी) यांनी सिंहगड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. उज्वल टेरेसमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोघे संशयित दिसून येत होते़ ते दुचाकीवरुन आले व त्यांनी हसन शेख व दिनेश भुसनर यांच्या पार्क केलेल्या आलिशान गाड्यांवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या होत्या़. सीसीटीव्हीमध्ये दिसणारे दोघेही धायरी राहत असून ते रायकर मळा येथील स्मशानभूमीजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़. त्यावरुन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले़. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी मोटारी पेटवून दिल्याची कबुली दिली़. या दोघांची अभिजित ऊर्फ बटऱ्या गाडे याच्याबरोबर वाद होते़. शेख यांच्यावर मे २०१५ मध्ये उंबऱ्या गणपतीजवळ काही जणांनी वार करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता़. त्यातून ते थोडक्यात बचावले होते़. त्यामध्ये अभिजित गाडे हा आरोपी आहे़. शेख यांची मोटार पेटवून दिली तर त्याचा संशय गाडे याच्यावर घेतला जाऊन त्यांच्यात भांडणे व्हावीत, या हेतूने दोघांनी हा प्रकार केला आहे़. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु जगताप,सहायक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे व तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी केली़.़़़़़़़़़

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस