बोपखेल-आळंदी बीआरटीवर बसथांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:44 IST2018-11-14T00:43:37+5:302018-11-14T00:44:25+5:30
आळंदी-पंढरपूर हा पालखी मार्ग आहे. त्याचे रुंदीकरण आणि वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

बोपखेल-आळंदी बीआरटीवर बसथांबे
पिंपरी : महापालिकेच्या हद्दीतील बोपखेल ते दिघी या दोन किलोमीटरच्या रखडलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणासाठी खासगी वाटाघाटी करून, भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. बोपखेल ते आळंदी दरम्यान बीआरटी मार्गावर बसथांबे उभारण्यासाठी आठ कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे.
आळंदी-पंढरपूर हा पालखी मार्ग आहे. त्याचे रुंदीकरण आणि वारीत सहभागी होणाºया वारकºयांना सुविधा पुरविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. साठ मीटर रुंद असलेल्या या मार्गावर पुणे-आळंदी बीआरटी मार्गही आहे. त्याचे बॅरिकेड्स उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बोपखेल ते दिघी हा दोन किलोमीटरचा मार्ग लष्करी हद्द, तसेच व्हीएसएनएल आणि टाटा कम्युनिकेशन या आस्थापनांजवळून जात असल्याने अद्यापही या जागेचे संपादन झालेले नाही. त्यामुळे यादरम्यान वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. ती सोडविण्यासाठी व्हीएसएनएल आणि टाटा कम्युनिकेशन या दोन आस्थापनांशी चर्चा करून, खासगी वाटाघाटीतून रस्त्यासाठी भूसंपादन करण्याचा ऐनवेळचा प्रस्ताव स्थायीने मंजूर केला आहे. याशिवाय या प्रक्रियेसाठी येणाºया खर्चासही मंजुरी दिली आहे. या ऐनवेळच्या प्रस्तावात खर्चाची रक्कम नमूद केलेली नाही.
बीआरटी थांब्यांसाठी आठ कोटी
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बीआरटी मार्गावर बॅरिकेड्सचे काम पूर्ण झाले आहे. या प्रक्रियेला किमान चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. येत्या मार्च महिन्यात हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी या मार्गावर बसथांबे उभारण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेत एका ठेकेदाराच्या २.१० टक्के कमी दराच्या आठ कोटी १३ लाखांच्या निविदेला मान्यता दिली आहे. तसेच बोपखेल ते दिघी या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत अनेक वर्षे केवळ चर्चा होत आहे. राष्ट्रवादीच्या काळात महापालिकेच्या अधिकाºयांनी व्हीएसएनएलच्या कोलकाता येथील कार्यालयात रस्तारुंदीकरणाचे सादरीकरण केले होते. त्या रस्ता रुंदीकरणाबाबत व्हीएसएनएल प्रशासन सकारात्मकही होते. मात्र, अजूनही रुंदीकरणाची प्रक्रिया अडकलेलीच आहे.