भांडणे सोडविणार्याचे केले हाड फ्रॅक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:09 IST2020-12-08T04:09:32+5:302020-12-08T04:09:32+5:30

पुणे : बॉल का मारला म्हणून झालेले भांडण सोडविल्याच्या रागातून एकाने क्रिकेटची बॅट गालावर मारुन हाड फ्रॅक्चर करण्याचा प्रकार ...

Bone fractures made by a conflict solver | भांडणे सोडविणार्याचे केले हाड फ्रॅक्चर

भांडणे सोडविणार्याचे केले हाड फ्रॅक्चर

पुणे : बॉल का मारला म्हणून झालेले भांडण सोडविल्याच्या रागातून एकाने क्रिकेटची बॅट गालावर मारुन हाड फ्रॅक्चर करण्याचा प्रकार आंबेगाव पठार येथे घडला.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सागर कोळेकर (रा. आंबेगाव पठार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अक्षय अशोक घुगे (वय २२, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय हे आंबेगाव पठार येथे शनिवारी सायंकाळी हॉलीबॉल खेळत होते. त्यावेळी सागर कोळेकर याने जोरात बॉल मारला. तेव्हा त्यांचा मित्र हरिष वर्मा याने त्यास बॉल का मारला, असे विचारले असता दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद अक्षय याने मिटवला. त्यानंतर अक्षय हे घरी जात होते. त्यावेळी सागर क्रिकेटची बॅट घेऊन तेथे आला. त्याने बॅटने अक्षय याच्या डाव्या गालावर जोरात मारली. त्याने अक्षयच्या गालाचे हाड फ्रॅक्चर झाले.

Web Title: Bone fractures made by a conflict solver