शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
4
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
5
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
6
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
7
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
8
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
9
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
10
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
11
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
12
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
13
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
14
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
15
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
16
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
17
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
18
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
19
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
20
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

कथित माओवादी कनेक्शन प्रकरण : मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 14:11 IST

माओवादी 'थिंक टँक' अटक प्रकरणाबाबत मुंबई हायकोर्टानं सोमवारी (3 सप्टेंबर)महाराष्ट्र पोलिसांची कानउघडणी केली आहे.

मुंबई -  माओवादी 'थिंक टँक' अटक प्रकरणाबाबत मुंबई हायकोर्टानं सोमवारी (3 सप्टेंबर)महाराष्ट्र पोलिसांची कानउघाडणी केली आहे. एल्गार परिषदेचं प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना पोलिसांकडून कोणत्या आधारे पत्रकार परिषद घेण्यात आली, अशा शब्दांत कोर्टानं पोलिसांना प्रश्न विचारत त्यांची कानउघाडणी केली आहे. शिवाय, एनआयए चौकशीची मागणी करणारी याचिकालाही 7 सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी केला गौप्यस्फोटमाओवादी 'थिंक टँक'च्या अटकेबाबत पोलिसांनी 31 ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली. अटक करण्यात आलेल्या कथित माओवादी 'थिंक टँक'कडून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे तसेच इतर पुरावे, प्रसारमाध्यमांसमोर सादर केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे अटक करण्यात आलेले सर्वजण माओवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या व्यक्तींविरोधात पुरावे मिळाल्यानंतरच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली होती. 

(Koregaon Bhima Violence: कोरेगाव भीमा भडकवण्यासाठी नक्षलींनी दिले होते ५ लाख रुपये; पोलिसांकडे भक्कम पुरावा)

"आम्हाला सबळ पुरावे मिळाल्यानंतरच आम्ही समाजातील या प्रस्थापित व्यक्तींविरोधात वेगवेगळ्या शहरांत छापे मारून कारवाई केली. आम्हाला मिळालेले पुरावे या व्यक्तींचे माओवाद्यांशी थेट संबंध असल्याचे दर्शवत होते," अशी माहिती या पत्रकार परिषदेवेळी महाराष्ट्र पोलिसांचे अतिरीक्त महासंचालक परमवीर सिंह यांनी सांगितले. तसेच मी 20 वर्षांपूर्वी चंद्रपूर, भंडारा येथे काम केले आहे. त्यामुळे तेव्हापासूनच शहरी नक्षलवादाबाबत मला कल्पना आहे, तसेच त्याविरोधात मी काम केले आहे असेही परमवीर सिंह यांनी स्पष्ट केले. 

पाच जणांना केली होती अटक28 ऑगस्टला पुणे पोलिसांनी देशभरात धडक कारवाई करत पाच जणांना अटक केली होती. डिसेंबर 2017मध्ये झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारासंदर्भात या धाडी टाकण्यात आल्या होत्या. कवी वारा वारा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद), व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) आणि अरुण फरेरा (ठाणे) यांच्या अटकेनं देशभरात खळबळ उडाली होती आणि राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. परंतु, हे सर्व जण माओवाद्यांचे थिंक टँक असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांना होता. आनंद तेलतुंबडे आणि फादर स्टॅन स्वामी यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली होती.

या संपूर्ण कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयानं पुणे पोलिसांना फटकारलं होतं आणि अटक केलेल्या पाचही जणांना कोठडीऐवजी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, आपल्या धडक धाडींमध्ये सापडलेल्या काही पत्रांमधून, ई-मेलमधून समोर आलेली स्फोटक माहिती आज पुणे पोलीस आयुक्त आणि अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.  

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारMumbai High Courtमुंबई हायकोर्टPoliceपोलिसnaxaliteनक्षलवादी