शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Accident: दौंडमध्ये बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात; एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 12:54 PM

बोलेरो चालक हा दारूच्या नशेत असल्याने त्याने अपघातस्थळी गाडी न थांबविता तो पळून गेला

खोर : दौंड तालुक्यातील खोर येथील खोपाडा - राजुरीपाटी नजीक बोलेरो व दुचाकी यांच्यात भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संभाजी अंबर शिंदे (वय २० वर्ष,रा.देऊळगावगाडा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संभाजी माणिकराव माने (वय २२ वर्ष रा.खोर,ता.दौंड) व दुचाकी चालक सतीश गुलाब ठोंबरे (वय २६ वर्ष रा.रिसे-पिसे) दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ७ नोव्हेंबरला रात्री ८:३० च्या सुमारास ही घटना घडली. तर बोलेरो चालक राजेंद्र बन्सीलाल डोंबे वय २६ वर्ष (रा.खोर, ता.दौंड) यास कोणतीही इजा झाली नाही. 

बोलेरो गाडी ही खोरच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. त्याचवेळी दुचाकीवरून तिघेजण हे भांडगावच्या दिशेने चालले होते. राजुरीपाटीच्या पुढे खोपड्या नजीक आल्यावर भरधाव वेगाने येत असलेल्या बोलेरो गाडीने दुचाकीला बोलेरो गाडीच्या मधोमध उडवून दिले गेले. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीस्वार संभाजी अंबर शिंदे हा युवक जागीच ठार झाला. तर संभाजी माने व सतीश ठोंबरे हे उडून रस्त्याच्या कडेला पडले गेले. गावातील नागरिक तिघांना भांडगाव येथील शिवमंगल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलने नकार दिल्यावर पुढे यवत येथील सरकारी दवाखान्याच्या अँब्युलन्स गाडीने दोन जखमींना पुढे लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहे. 

बोलेरो चालक हा दारूच्या नशेत असल्याने त्याने अपघातस्थळी गाडी न थांबविता तो पळून गेला. मात्र पिंपळाचीवाडी येथे नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही बोलेरो गाडी पकडण्यात नागरिकांना यश आले. याबाबत यवत पोलीस ठाण्यात बोलेरो चालक राजेंद्र डोंबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश कर्चे व रमेश कदम करीत आहेत.

टॅग्स :daund-acदौंडAccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक