शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील कात्रज तलावात आढळला महिलेचा मृतदेह; महिनाभरातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 12:35 IST

महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून मिसिंगच्या काही तक्रारीवरून शोध लावला जाणार

कात्रज : कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात मंगळवारी सकाळच्या सुमारास एक महिलेचा मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगत असल्याचे सुरक्षारक्षकाला आढळून आले. सुरक्षा रक्षकाडून याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पोलीस प्रशासन तसेच अग्निशमन दलाला माहिती मिळताच घटनास्थळावर दाखल झाले. अग्निशामक दलाच्या पाच जवानांकडून महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

 महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून मिसिंगच्या काही तक्रारी आल्या आहेत का हे पडताळून मृतदेहाची ओळख पटवण्यात येईल असे सांगण्यात आले. तसेच महिलेचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून येथे पाठवण्यात आला. या घटनेदरम्यान कात्रज तलाव परिसरामध्ये बघ्यांची गर्दी जमलेली होती. यावेळी अग्निशामक दलाकडून तांडेल - वसंत भिलारे, फायरमन प्रसाद कदम, निलेश राजीवडे, शुभम शिर्के, अविनाश लांडे, ड्राइवर  गोगावले उपस्थित होते.

''कात्रज अग्निशमन दलाला साधारण १०  च्या सुमारास  यासंदर्भात कॉल आला होता. अग्निशमन चे पाच जवान, एक ड्रायव्हर , एक अधिकारी यांनी मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. - संजय रामटेके, केंद्रप्रमुख, कात्रज.''

''तब्बल २९ एकर जागेमध्ये पेशवे तलाव आहे. येथे रात्र दिवस एक सुरक्षा असतो. तसेच रस्ता खुला असल्याने परिसरातील लोक ये - जा करत असतात.  त्यामुळे अशा घटनांवर अंकुश ठेवणे कठीण आहे. - वसंत मोरे, माजी नगरसेवक.''

''कात्रज तलाव परिसरामध्ये अशा घटना टाळण्यासाठी शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सुरक्षा रक्षक वाढवण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे.  त्यामुळे येथील सुरक्षा रक्षक वाढवावे. - महेश कदम,शिवशंभू प्रतिष्ठान.'' 

टॅग्स :katrajकात्रजWaterपाणीPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दलWomenमहिला