Pune : चासकमान कालव्यात आढळला महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:08 IST2023-01-24T14:05:45+5:302023-01-24T14:08:18+5:30

नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला...

Body of woman found in Chaskaman Canal pune latest crime news | Pune : चासकमान कालव्यात आढळला महिलेचा मृतदेह

Pune : चासकमान कालव्यात आढळला महिलेचा मृतदेह

शिरुर (पुणे) : वाजेवाडी गावातील मांजरेवाडी येथील चासकमान कालव्याच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष कचरूनाना वाजे, पोलिस पाटील सोनाली वाजे, पोलिस हवालदार मंगेश लांडगे, पोलिस शिपाई भास्कर बुधवंत यांनी राजू मांजरे, आबा मांजरे, बंटी मांजरे यांसह नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढत महिलेबाबत आजूबाजूला चौकशी केली.

कचरूनाना वाजे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली असल्याने, शिक्रापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, या महिलेचे वय अंदाजे ४० ते ५० वर्षे, अंगात पिवळ्या रंगाची नववारी साडी, चोकलेटी रंगाचा ब्लाऊज, गळ्यात काळी पोत व लाल दोरीमध्ये एक चावी, हातात लाल रंगाच्या बांगड्या असे वर्णन आहे.

Web Title: Body of woman found in Chaskaman Canal pune latest crime news