Pune: कोरेगाव पार्क परिसरात सापडला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह; खून की आत्महत्या?
By नितीश गोवंडे | Updated: March 16, 2024 14:32 IST2024-03-16T14:31:42+5:302024-03-16T14:32:39+5:30
याबाबत पुणे शहर नियंत्रण कक्षाला शनिवारी (ता. १६) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास माहिती मिळाली...

Pune: कोरेगाव पार्क परिसरात सापडला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह; खून की आत्महत्या?
पुणे : शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. ७ मध्ये हा मृतदेह आढळला. याबाबत पुणे शहर नियंत्रण कक्षाला शनिवारी (ता. १६) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दत्तात्रय कुरळे असे मृतदेह आढळून आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून ते पुणे पोलिस दलाच्या एमटी विभागात (मोटार परिवहन) कार्यरत होते. पोलिस शिपाई म्हणून पोलिस दलात भरती झालेले दत्तात्रय कुरळे हे पदोन्नतीने पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचले होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून हा खून आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.