पुणे-सोलापूर महामार्गावर चौक ओलांडताना वाहनाने उडवले; तरुणाचा मृत्यू

By नम्रता फडणीस | Updated: January 9, 2024 17:10 IST2024-01-09T17:08:01+5:302024-01-09T17:10:39+5:30

नायगाव चौक ओलांडत असताना भरधाव वाहनाने लखन यांना धडक दिली....

Blown up by vehicle while crossing intersection on Pune-Solapur highway; Death of a young man | पुणे-सोलापूर महामार्गावर चौक ओलांडताना वाहनाने उडवले; तरुणाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर चौक ओलांडताना वाहनाने उडवले; तरुणाचा मृत्यू

पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी परिसरात ही घटना घडली. लखन बाळू गायकवाड (वय ३६, रा. कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत लखन यांचा चुलतभाऊ सागर (वय ३५) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लखन पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी परिसरातून निघाले होते. नायगाव चौक ओलांडत असताना भरधाव वाहनाने लखन यांना धडक दिली.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या लखन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके तपास करत आहेत.

Web Title: Blown up by vehicle while crossing intersection on Pune-Solapur highway; Death of a young man