हवेली तहसील व पंचायत समितीच्या रक्तदान शिबिरात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 15:13 IST2021-09-24T15:12:53+5:302021-09-24T15:13:27+5:30
रक्तदान शिबिर पुणे ब्लड बँक,हडपसर यांच्या सहकार्यातून पार पडले असून एकूण ७५ बँग रक्त संकलन झाले

हवेली तहसील व पंचायत समितीच्या रक्तदान शिबिरात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले रक्तदान
वाघोली : वाघोली येथे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेऊन पालकमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हवेली तहसील व पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरीय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्वतः रक्तदान केले.
एकूण ७५ बँग रक्त संकलन झाले. सदर रक्तदान शिबिर पुणे ब्लड बँक,हडपसर यांच्या सहकार्यातून पार पडले. यावेळी ग्रामस्थांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावे असे आवहान आमदार अशोक पवार व जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, लोणीकंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, सरपंच वसुंधरा उबाळे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव, सुनील जाधवराव, अनिल सातव, संतुलन संस्थेचे बस्तू रेगे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा वर्कर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.