शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

लोणावळा मार्गावर रविवारी ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 7:00 PM

मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्वयंचिलत ब्लॉक सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी तळेगाव-शेलारवाडी-देहूरोड या स्थानकांदरम्यान लोणावळा मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देलोणावळा मार्गावर प्रत्येक एक किलोमीटर दरम्यान सिग्नल उभारला जाणार या कामांमुळे गाड्यांना होणारा विलंब टाळता येणे शक्य

पुणे : मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्वयंचिलत ब्लॉक सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी तळेगाव-शेलारवाडी-देहूरोड या स्थानकांदरम्यान रविवारी (दि. १२) लोणावळा मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे यावेळेत लोणावळालोकल सेवा प्रभावित होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. लोणावळा मार्गावर प्रत्येक एक किलोमीटर दरम्यान सिग्नल उभारला जाणार आहे. या कामांमुळे गाड्यांना होणारा विलंब टाळता येणे शक्य होईल. ब्लॉकमुळे रविवारी पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी ५.४५, ६.३०, दुपारी १२.१५, १ व ३ वाजता सुटणारी लोणावळा लोकल धावणार नाही. तसेच शिवाजीनगर येथून सकाळी ११.२० वाजता सुटणारी लोणावळा लोकल आणि पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी ६.५० व ८.५७ वाजता सुटणारी तळेगाव लोकलही रद्द झाली आहे. लोणावळा स्थानकातून सकाळी ६.३०, ८.२०, १०.१०, दुपारी २, २.५० व ३.४० वाजता सुटणारी लोकल धावणार नाही. सकाळी ९.५७ ची तळेगाव-शिवाजीनगर व सकाळी ७.५० ची तळेगाव-पुणे लोकलही रद्द करण्यात आली आहे. ब्लॉकच्या कालावधीत पुण्यातून सकाळी ८.०५ व ९.५५ वाजता लोणावळाकडे जाणारी आणि लोणावळा येथून सकाळी ७.२५ व ११.३० सुटणाऱ्या लोकल नियमित धावतील, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Puneपुणेlonavalaलोणावळाrailwayरेल्वेlocalलोकल