शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

रेशनिंगच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश

By admin | Updated: December 18, 2014 04:27 IST

गोरगरिबांच्या तोंडचा घास काढून स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने पर्दाफाश केला

पुणे : गोरगरिबांच्या तोंडचा घास काढून स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने पर्दाफाश केला असून, स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळाबाजार उघडकीस आणला आहे. कोंढव्यातील एका गोडावूनवर छापा टाकत काळ्याबाजारात जाणारा तब्बल ७७ लाख ५ हजार ५५० हजारांचा रेशनिंगचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये तांदळाची १३७६ पोती आणि २३६ पोती गहू जप्त केल्याची माहिती युनिट तीनचे निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.विक्रम गणपत रोकडे (२७, रा. मार्केटयार्ड), सचिन महादेव नवले (२३, रा. काळेपडळ), मंगेश बाळासाहेब कामठे (२९, रा. तक्रारवाडी), संदीप लहू गायकवाड (४०, रा. पिंगोरी), नरसिंग गुलाबराव जगताप (५५, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात पुरवठा निरीक्षक अजित शांताराम गांगडे (५२,रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री बिबवेवाडी येथे झालेल्या खुनाच्या तपासासाठी युनिट तीनचे सहायक निरीक्षक बाबर आणि त्यांचे सहकारी मंगळवारी पहाटे फिरत होते. त्या वेळी त्यांना गंगाधाम चौकामध्ये संशयास्पद अवस्थेत उभा केलेला ट्रक दिसला. त्याच्या चालकाकडे चौकशी केल्यावर, त्याच्यावर पोलिसांना संशय आला. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर, त्याने ट्रकमध्ये रेशनिंगच्या दुकानातून काळ्या बाजाराने आणलेली धान्याची पोती असल्याची माहिती दिली. माल घेऊन जात असलेल्या गंगाधामजवळील गोडावूनवरही पोलिसांनी छापा टाकला. हे गोडावून रोकडे आणि कसवेच्या मालकीचे आहे. गोडावूनमध्ये एकूण चार ट्रक उभे होते. यातील दोन ट्रकमधील माल उतरवण्यात आलेला होता, तर दोन ट्रकमध्ये माल भरलेला होता. या चारही ट्रकमध्ये एकूण ७७ लाख ५ हजार ५५० रुपयाचा माल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या पोत्यांवर शासकीय शिक्के मारलेले आहेत. पुढील तपास गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके, उपायुक्त जयंत नाईकनवरे, सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत.