शिवसेनेलाही संपविण्याचा भाजपचा डाव - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 06:16 IST2019-07-29T06:16:07+5:302019-07-29T06:16:33+5:30

पुणे : आपल्या समोर कोणताही राजकीय पक्ष टिकू नये असेच राजकारण सध्या भाजप देशात आणि राज्यात करत आहे. त्यामुळे ...

BJP's left to end Shiv Sena - Jayant Patil | शिवसेनेलाही संपविण्याचा भाजपचा डाव - जयंत पाटील

शिवसेनेलाही संपविण्याचा भाजपचा डाव - जयंत पाटील

पुणे : आपल्या समोर कोणताही राजकीय पक्ष टिकू नये असेच राजकारण सध्या भाजप देशात आणि राज्यात करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेलाही संपवून हिंदुत्वाची मते विभागली न जाता केवळ आपल्याकडे असावी, असा भाजपचा डाव आहे. मित्र पक्ष आपल्याच संपवायचा प्रयत्न करतोय हे लवकरच शिवसेनेच्या लक्षात येईल, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे केले. 

गेल्या काही दिवसांतील घडामोडीमुळे राज्यात भाजपची प्रतिमा मलीन झाली असून, सर्व मार्गांचा अवलंब करून कोणत्याही परिस्थितीत सत्ता टिकविणारा भ्रष्ट राजकीय पक्ष म्हणून भाजप ओळखला जाईल, अशी टीकाही त्यांनी केली. मला पाच वर्षांपासून भाजप ऑफर देत आहे. मात्र माझ्या शरीरात प्राण आहेत, तोपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: BJP's left to end Shiv Sena - Jayant Patil