शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांनाच मंत्रीपदे देणारे भाजप वॉशिंग मशीन; पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

By राजू इनामदार | Updated: July 10, 2023 15:26 IST

भाजपने नारायण राणे यांच्यापासून ते आता अजित पवार यांच्यापर्यंत शेकडो जणांना याच पद्धतीने त्यांनी स्वच्छ केले

पुणे : ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर करून नंतर त्यांनाच पक्षात घेऊन मंत्रीपदे देणाऱ्या भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप वॉशिंग मशिन आहे. तसेच धुलाई पावडर आहे. कारण भ्रष्टाचारी लोक त्यांच्यात गेले की पावन होतात असा आरोप करत काँग्रेसच्या शहर शाखेने सोमवारी सकाळी आंदोलन केले. भाजपच्या शहर कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

आमदार रविंद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे तसेच प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत सुरसे, शहर सरचिटणीस रमेश अय्यर, महिला आघाडी अध्यक्ष पूजा आनंद, युवक काँग्रेसचे प्रथमेश अबनवे नरुद्दीन सोमजी, अविनाश बागवे व अन्य पदाधिकारी आंदोलनाला उपस्थित होते.

भाजपच्या शहर कार्यालयासमोरच्या रस्त्यावर आंदोलकांनी वॉशिंग मशिनची प्रतिकृतीच आणली होती. त्यावर भाजप वॉशिंग मशिन असे ठळक अक्षरात लिहिले होते. त्यात मोहन जोशी यांनी भ्रष्टाचार असे लिहिलेले काळा टी-शर्ट टाकला. त्यात भाजप वॉशिंग पावडर टाकली व थोड्या वेळाने त्यातून पांढरा शुभ्र टी-शर्ट काढलून दाखवला.

जोशी म्हणाले, “सध्या देशभर हाच उद्योग चालला आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव टाकायचा. आरोप करायचे, ईडीची नोटीस पाठवायची व नंतर त्याच लोकांना भाजपत घ्यायचे किंवा सत्तेला त्यांचा पाठिंबा घ्यायचा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यापासून ते आता अजित पवार यांच्यापर्यंत शेकडो जणांना याच पद्धतीने त्यांनी स्वच्छ केले आहे.” काँग्रेस अशा भ्रष्ट राजकारणाच्या कायम विरोधातच आहे, संतमहंतांच्या महाराष्ट्र भूमीत या प्रकारचे राजकारण चालणार नाही हे मतदार त्यांना दाखवून देतील असा इशारा जोशी यांनी दिला. आमदार धंगेकर यांनीही यावेळी भाजपवर टीका केली. राज्यातील मतदार भाजपच्या या राजकारणाला थारा देणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप कार्यालयाच्या समोर उभे राहून यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन