बारामती: प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्लयाचा प्रथमत: निषेध व्यक्त करतो. पण विधानसभेच्या अगोदर लक्ष्मण हाकेंवर हल्ला का झाला, तो कोणत्या ब्रिगेडने केला होता. तेव्हा प्रवीण गायकवाड पुढे येऊन बोलले नाहीत. प्रविणदादा गायकवाड हे बेडगी पुरोगामी आहेत. ते नेहमी भाजपला मनुवादी म्हणतात. नाव बहुजनांचे घ्यायचं, काम मात्र पवार फॅमिली, कोल्हापुरचे महाराज, संस्थानिक, वतनदारांचे करतात. संघर्षाची वेळ आली की घरात लपून बसायचं, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी गायकवाड यांच्यावर केली आहे. हाके हे गुरुवारी (दि. १७) बारामती दाैऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते.
हाके म्हणाले, आम्ही लोकशाही संविधानिक चाैकट मांडणारी माणसं आहोत. कायदेशीर मार्गाने जेवढी आंदोलने करता येतील आणि तुमच्या समस्यांकडे लक्ष वेधता येतील ते मार्ग अवलंबले पाहिजेत,असे म्हणत त्यांनी या घटनेचा निषेध केला. जेवढी आंदोलने पण पेराल ते उगवेल असे म्हणण्याचे कारण असं होते. ते यासाठी की, संभाजी ब्रिगेडने गेल्या पंधरा ते वीस वर्षांच्या काळात हेच केले आहे. पत्रकारांवर शाई फेक केली. तोंड काळे केली. अनेक ग्रंथालय फोडली, पुतळे उखडून फेकले आहेत. बहुजन समाजातील नेत्यांना नेहमी टार्गेट केले आहे. जेव्हा गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पुरोगामी विचारावर हल्ला झाला, बहुजनावर हल्ला झाला, मनुवादी लोकांनी हल्ला केला असे म्हटले जाते.
प्रविणदादा गायकवाड हे बेडगी पुरोगामी आहेत. ते भाजपवर नेहमी मनुवादी असल्याची टीका करतात. मात्र त्याच भाजपच्या मांडीला मांडी लावून उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेमधील खीर अोरपण्याचे काम करत आहेत. राज्यात सर्वाधिक साखर कारखाने कोणाचे आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या धनगर समाजाकडे एकही साखर कारखाना नाही, अशी टीक हाके यांनी केली.
सामाजिक न्याय विभागावर भाजपा आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर हाके म्हणाले, याला जबाबदार उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत. आदिवासी, समाज कल्याण विभागाचा शेकडो कोटी रुपयांचा निधी, ओबीसीच्या महाज्योतीचा दीडशे कोटी रुपयांचा बॅकलॉक, सारथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी सात सात आठ लाख रुपये जमा करणारे पवार महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र एक रुपयाही द्यायला तयार नाहीत. हा कोणता न्याय आहे,असा सवाल हाके यांनी केला.
राज्य उत्पादन शुल्क विभाग अजित पवार यांंना यासाठी हवा आहे कि,जय पवारांचा जो दारुचा कारखाना आहे.त्याच दररोजच उत्पादन एक लाख दहा हजार लिटरच आहे.तो कारखाना चालवायचा आहे.म्हणुन त्यांना हा विभाग आहे,असा आरोप हाके यांनी केला.