bjp supporters stand a flex congratulating girish bapat | विराेधकांना बसली सणसणीत चापट पुण्यनगरीचे खासदार गिरीश बापट ; पुण्यात पाेस्टरबाजी
विराेधकांना बसली सणसणीत चापट पुण्यनगरीचे खासदार गिरीश बापट ; पुण्यात पाेस्टरबाजी

पुणे : लाेकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर देशभरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लाेष करण्यात येत आहे. पुणे लाेकसभेची जागा भाजपाचे उमेदवार गिरीश बापट जिंकतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरवातीपासून व्यक्त करण्यात येताे. काल लागलेल्या निकालानंतर गिरीश बापट विजयी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप शहर कार्यालयाबाहेर पाेस्टर लावत बापट यांचे अभिनंदन केले आहे. विराेधकांना बसली सणसणीत चापट पुण्यानगरीचे खासदार गिरीश बापट असे लिहीलेला फ्लेक्स भाजप कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आला आहे. भाजपाचे कार्यकर्ते राघवेंद्र मानकर यांनी हा फ्लेक्स लावला आहे. 

पुण्याची लाेकसभेची निवडणुक गाजली हाेती. भाजप युतीकडून गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेक दिवस काॅंग्रेसला आपला उमेदवार सापडत नव्हता. एकीकडे बापट यांचा प्रसार सुरु झालेला असताना दुसरीकडे काॅंग्रेस उमेदवाराच्या शाेधात हाेती. यात अनेकांची नावे समाेर आली. अखेर काॅंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून माेहन जाेशी यांना उमेदवारी दिली. परंतु काॅंग्रेसकडून जाेशी यांचा म्हणावा तसा प्रचार झाला नाही. मतमाेजणीच्या दिवशी देखील पहिल्या फेरीपासूनच गिरीश बापट यांनी आघाडी घेतली हाेती. शेवटच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिली. पुण्याचा निकाल जाहीर हाेण्यासाठी रात्री उशीर झाला परंतु पाचव्या- सहाव्या फेरीत गिरीश बापट यांनी दीड ते दाेन लाखांची लीड घेतल्याने त्यांचा विजय निश्चित झाला हाेता. बापच यांनी  ३,०९८४८  मतांनी जाेशींचा पराभव केला. दुपारीच बापट यांनी शुभेच्छा देणारे फ्लेक्स शहरात लागण्यास सुरुवात झाली हाेती. संध्याकाळी बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधत विजयाचा निश्चय व्यक्त केला तसेच पुण्याचा चेहरा माेहरा बदलून टाकण्याचे आश्वासन दिले. 

आज सकाळी गिरीश बापट यांनी विजयी रॅली काढली. बापट यांच्या विजयाचे अभिनंदन करणारे फ्लेक्स शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले हाेते. 


Web Title: bjp supporters stand a flex congratulating girish bapat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.