शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

शरद पवार यांना घुमजाव का करावं लागलं?; भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 6:10 PM

शरद पवार यांना आरक्षण जातीनिहाय न देता आर्थिक निकषांवर द्यावे असे विधान करत आपल्याच जुन्या मतावरून घुमजाव का करावं लागलं, असा सवाल भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला.

ठळक मुद्देशरद पवार यांनी मांडलेल्या मतांवर वर्तवले जात आहेत अनेक राजकीय अंदाजहिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय विचारांच्या पक्षांची ताटातूट होऊ नये : भांडारी

पुणे : शरद पवार यांना आरक्षण जातीनिहाय न देता आर्थिक निकषांवर द्यावे असे विधान करत आपल्याच जुन्या मतावरून घुमजाव का करावं लागलं, असा सवाल भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे शहाराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.पवार यांची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीची चर्चा सध्या रंगलेली दिसत आहे. त्यात पवार यांनी मांडलेल्या मतांवर अनेक राजकीय अंदाजही वर्तवले जात आहेत. याच मुलाखतीत पवार यांनी आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे, असे मत मांडले होते. त्यावर भंडारी यांना विचारले असता त्यांनी पवार यांचे हे मत गांभीर्याने घ्यायला हवे असे सांगितले. दोन वर्षांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी याच अर्थाचे विधान केल्यावर मात्र याच पवारांनी थयथयाट केल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे मागील दोन वर्षात इतकं काय घडलं की त्यांना आपल्या मतापासून घुमजाव करावा लागला, असे ते म्हणाले. इतकेच नव्हे तर पवार यांनी मुलाखतीत ओबीसी आरक्षणाबद्दल अवाक्षरही काढले नसण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिवसेनेच्या स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या निर्णयावर भाष्य करताना आम्ही त्यांना मित्रपक्ष मानतो. त्यामुळे हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय विचारांच्या पक्षांची ताटातूट होऊ नये अशी इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेPuneपुणे